किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महामार्गावरील मुरमाच्या डिगाराला धडकुन दोघे जागीच ठार* *शिबदरा पाटी येथील आठवड्यातील दुसरी घटना *गुत्तेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येकी 50 लाख देण्याची जनतेतुन मागणी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.26.जिल्यातील हदगाव तालुक्यात चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून चालू आहेत वारंगा ते महागाव हे काम करीत असताना जागोजागी खड्डे, वळण रस्ते व तसेच जागोजाग मुरुमांचे ढिगारे असल्याने अनेक अपघात घडत आहेत.हे काम करणा-या कंपनीच्या निष्काळजी पणामुळे या दोन महिन्यांमध्ये सात अपघात मध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले.

तरीसुद्धा संबंधित कंपनीला जाग यायला तयार नाही दि.२५ रोजी हिगोली जिल्ह्यातील चिखली गावात तालुका कळमनुरी येथे अंत्यविधी करून आपल्या गावाकडे हरडप ता. हदगावकडे परत येत असताना शिबदरा पाटी येथे महामार्गावर मध्यभागी मुरमाचा मोठा अधिकार टाकला आहे. त्या ढिगारापुढे कुठल्याही प्रकारचे दिशा दाखवणारे फलक….ना रस्ता बंद असल्याचे फलक.. नसल्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांमुळे काही दिसत नसल्याने अपघाताची मालिका चालूच आहे.असे असताना देखील संबंधित कंपनीकडून कासव गतीने काम केले जात असल्यामुळे या माहर्गावर सातत्याने अपघात घडत आहेत संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

हरडफ येथील सटवाराव सूर्यवंशी वय ४८,माधव बोंढारे वय ५०, राहणार हरडप तालुका हदगाव हे दोघे जण चिखली येथे अंत्यविधीला मोटरसायकलने गेले होते. परत आपल्या गावाकडे हरडपला जात असताना शिबदरा पाटी येथे वेळ ७.३५ वाजता मुरमाच्या ढिगाराला धडकून दोघे जण जागीच ठार झाले.मनाठा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी बीट जमादार गिरी व त्यांचे सहकारी पोहोचून.पुढील प्रक्रिया चालू केली होती.

878 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.