किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

तालुक्यात होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत दिरंगाई व निष्काळजीपणे होत असल्याने।राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडणार-प्रकाश गब्बा राठोड

किनवट ता. प्र दि १६ तालुक्यात होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत दिरंगाई व निष्काळजीपणे होत असल्याने अनेक नागरीकांना जिव गमाववा लागला आहे त्या विरुध्द राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी हुंकार भरला असुन राष्ट्रीय महामार्ग यंत्रेणे विरोधात तिव्र जनाआंदोलन करणार असल्याचे प्रकाश राठोड यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा अनेक समध्यांचे उगमस्थान झाले असुन किनवट शहरात दुभाजक, राष्ट्रीय महामार्ग बनवतांना पाळल्या जाणाने नियमांचे उल्लघंन यामुळे होत असलेले अपघात व नागरीकांचा मृत्यु , वाहतुकीचा खोळंबा या विरुध्द राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करणार असुन माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन किनवट तालुक्यात होत असलेले रुंद व समस्यांनी ग्रासलेल्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भात गा-हाणे मांडणार आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने शहरातुन होत असलेल्या रस्त्याच्या रुंदीवर आक्षेप घेतला आहे तर शहरातुन जात असलेल्या रस्त्यावर दुभाजक उभारला गेला पाहिजे अशी मागणी हि केली आहे तर दोन्ही बाजुने नालीचे बांधकाम होत असतांना सोडलेली जागा वापरात आणावी अशी हि मागणी केली असुन किमाण ३० मीटर रुंद मार्ग व्हावा अशी मागणी केली आहे तर होत असलेले निकृष्ठ काम लवकरच बंद पाडणार असुन झालेल्या कामात सुधारणा करण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे हि तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी माध्यमांना सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणा दरम्यान होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे अनेक अपघात झालेले आहे त्यामुळे अनेक नागरीकांना आपले जिव गमवावे लागले आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे सुमारे ४ वर्षापासुन सदर काम चालु असुन एवढा वेळ एखाद्या कामाला लागणे हे अत्यंत दुर्भाग्यजण्य असुन या सर्वा विरुध्द लवकरच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाव्दारे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

484 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.