किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामातील दिरंगाई,तालुक्यातील भेडसावणाऱ्या समस्या साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

किनवट ता. प्र दि २२ किनवट माहुर तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामातील दिरंगाई, विस्कळलेली घडी व नागरीकांना या मार्गासंदर्भात भेडसावत असलेल्या समस्यां सोडवण्या करिता माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आक्रमक भुमिका घेतली असुन नाईक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार (भा.प्र.से) यांची भेट घेऊन त्यांच्याशी भेडसावत असलेल्या समस्ये संदर्भात सविस्तर चर्चा केली असता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने सादर केलेल्या निवेदनात काही प्रमुख मुद्दे मांडले आहेत यावेळी पत्रकारांची सुध्दा उपस्थिती होती.
किनवट तालुक्यातील इस्लापुर ते माहुर असे जात असलेल्या या मार्गावर प्रमुख गावांना व ग्रामिण भागातील प्रत्येक खेड्या, वाडी , तांड्याला जोडणा-या रस्त्याला सर्व्हिस रोड तयार न केल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. निर्माण होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची उंची हि जास्त असल्याने ग्रामीण भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडले जाणारे रस्ते हे कमी उचींचे असल्याने वाहनधारकांना मुख्यमार्गावर प्रवास करण्या करिता जास्त गतीने वाहन चालवावे लागत आहे, या कारणामुळे मुख्य मार्गावरील वाहनाशी टक्कर होऊन एखादी अप्रिय घटना घटीत होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने सादर केलेल्या निवेदनात हि समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. तर प्रत्येक मुख्य गाव व खेडे हे राष्ट्रीय महामार्गाशी जोडतांना सर्व्हिस रोड निर्मान करावे अशी मागणी केली आहे. मौजे कोठारी ते अयप्पास्वामी मंदिर पर्यंत असलेली वाहतुकीची वर्दळ व या मार्गावर असलेली शाळा, महाविद्यालय, मंदिर, मश्जिद, नर्सरी यामुळे हे मार्ग नेहमी वाहतुकीने भरलेले असतात अशा अत्यंत वर्दळीच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग मंजुर होण्यापुर्वी ८० ते १०० फुट रुंद मार्ग होता परंतु राष्ट्रीय महामार्ग मंजुर झाल्या नंतर या मार्गाची रुंदी वाढणे आवश्यक असतांना सद्य स्थितीत या मार्गावर उपलब्ध जागे पेक्षा कमी रुंदीचे रस्ते तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग यंत्रणे कडुन चालु असल्याने संताप व्यक्त केला जात आहे तर या प्रश्नी माशी कुठे शिंकली व कोणत्या राजकिय वरदह्स्ताच्या दबापुढे हि यंत्रणा काम करत आहे का ? असा सवाल हि या निमित्त उपस्थित केला जात आहे.
मौजे कोठारी ते अयप्पा स्वामी मंदिर या मार्गावर पुर्वी ८० ते १०० फुट रस्ता होता तर राष्ट्रीय महामार्ग मंजुर झाल्या नंतर रुंदी वाढेल हि अपेक्षा असतांना या मार्गाची रुंदी ५० ते ४० फुट केली जात असल्याने भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागु शकते. प्रशासनाने यापुर्वी या मार्गावरील नगर परिषदेची नविन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालयाची नविन प्रशासकीय इमारत, न्यायालयाची कुंपन भिंत हि राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित होऊ शकते यामुळे जागा मोकळी सोडुन बांधली आहे. मग मोकळी सोडलेली जागा कोणाच्या लाभाकरिता सोडलेली आहे. हा हि प्रश्न या ठीकाणी उपस्थित केला जात आहे. तसेच या मार्गावर दोन्ही बाजुने होत असलेले नालीचे बांधकाम हे कमी रुंदीवर जागा सोडुन केले जात आहे तर ती जागा निरुपयोगी ठरणार असुन आजच्या स्थितीत ज्या जागेवर नाली आहे त्याच जागेवर नालीचे बांधकाम होने अपेक्षित असतांना नाली सोडुन कमी रुंदीवर बांधकाम केले जात आहे त्या एवजी त्याठीकाणी नाली व फुटपाथ ची निर्मिती केली गेली पाहिजे असे हि निवेदनात नमुद केले गेले आहे.
पत्रकारांशी झालेल्या चर्चेत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी सांगितले कि, तालुक्यात असे निरंकुश कामे होत राहिली तर आगामी काळात अनेकांचे जिव अपघातामुळे जाऊ शकते, आज तालुक्यात फिरतांना या राष्ट्रीय महामार्गातील त्रुटी निदर्शनास येत आहेत त्या कशा दुर होतील याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करुन लवकरच समस्या सोडवण्यात येईल असे हि त्यांनी सांगितले आहे. तसेच इस्लापुर ते माहुर या मार्गावर ज्या ज्या ठीकाणी चौरस्ते आहेत त्या त्या ठीकाणी मोठ्या सर्व्हिस रोडची नितांत आवश्यकता आहे त्या करिता देखिल राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर निवेदनावर बाजार समिती चे सभापती अनिल पाटील, वैजनाथ करपुडे, प्रविण म्याकलवार, कचरु जोशी, अमरदिप कदम, प्रेमसिंग जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत तर अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह होती.

71 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.