किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख पदी शंकर सिंह ठाकूर तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती शिकारे

नांदेड:-( प्रतिनिधी ) जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा. अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या आदेशावरून आणि जनशक्ती संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा. उमाकांत पाटील तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख ( दक्षिण ) पदी नांदेड येथील धडाडीचे कार्यकर्ते शंकर सिंह ठाकूर यांची तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती शिकारे यांची निवड करण्यात आली.
शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सदर निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना आपल्या संघटनेचे ध्येय धोरण व समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहचून शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अनाथ, युवावर्ग, विद्यार्थी आणि निराधार यांच्या न्याय हक्कासाठी तत्वशिल राहून संघटनेच्या नियमाशी बांधील राहून संघटनेची प्रतिमा उंचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या निवडीच्या वेळी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष बाळू पाटील शिरफुले, नांदेड जिल्हा सचिव दिनेश जाधव, जिल्हा सरचिटणीस रंगराव देशमुख, जिल्हा सचिव (दक्षिण) यज्ञेकांत कोल्हे, वैभव देशमुख, अजित पाटील युवा राज्य संपादक आदीजण उपस्थित होते.
या निवडी बाबत सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

378 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.