किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बेटमोगरा येथे रमाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने१२४ वा.रमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा*. *करुणेचा महासागर म्हणजे माता रमाई आंबेडकर – गंगाधर सोंडारे

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.जिल्यातील मुखेड तालुक्या मधील बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली सात – आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात,विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी महामाता,त्यागमुर्ती, विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मोत्सवा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवीन्यात येतात त्याच अनुषंगाने दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी सोमवारी संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या संयोजनातून बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार येथे रमाई जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० :३० वा. झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटक भा.बौ.म. मुखेड तालुकाध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राहुल कांबळे (पशुधन विमा अधिकारी), व प्रमुख पाहुणे भिमधाडस सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपील भाऊ गोणारकर,ललीताबाई मालू सोनकांबळे (माजी ग्रा.पं.सदस्या)तसेच रमाई फाउंडेशन चे संस्थापक/सचिव पत्रकार भारत सोनकांबळे सह
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महामाता त्यागमुर्ति रमाबाई आंबेडकर यांच्या पुर्नाकृती प्रतिमांचे पुष्पहाराने, दिपाने व धुपाने पुजन करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर बुध्द धम्माच्या नितीनियमांनुसार सामुदायीक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी आपले मनोगत
व्यक्त करताना भारतीय बौध्द महासभेचे आयु.गंगाधर सोंडारे बावलगावकर यांनी अतिशय सुंदर रित्या रमाबाई भिमराव आंबेडकर यांचे जीवन कार्य विशद करताना ते पुढे म्हणाले की,माता रमाबाई आंबेडकर ह्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात डॉ.बाबासाहेबांची सावली बनून राहील्या व ” रमाई ” म्हणजे करुणेचा महासागर असून माता रमाईने आपल्या आयुष्यभराच्या त्यागाने अन् श्रमाने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्याला माता रमाबाई आंबेडकर यांचे अतिशय महत्वाचे योगदान लाभले आहे असे मत व्यक्त केले.
त्याचबरोबर डॉ.राहुल कांबळे यांनी ही रमाबाई आंबेडकर यांचा त्याग जीवन कार्य विशद केले.

या कार्यक्रमाला ललीताबाई सोनकांबळे,सागरबाई दत्ता सोनकांबळे,शांताबाई सोनकांबळे, इंदाबाई सोनकांबळे, सागरबाई पोटफोडे,निवृती पोटफोडे,देवूबाई पोटफोडे, प्रल्हाद सोनकांबळे,दिपक सोनकांबळे,रामजी सोनकांबळे(स.शि.),हरिदास कांबळे,राहुल सोनकांबळे,
भिम धाडस चे केतनभाऊ भेदेकर,संजय भद्रे,प्रितम सोनकांबळे,कपील सोनकांबळे,सागर पोटफोडे सह बेटमोगरा व परिसरातील असंख्य भिमसैनीकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई फाउंडेशन बेटमोगरा या संस्थेचे चे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रल्हाद सोनकांबळे यांनी केले.

313 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.