मौजे डोंगरगाव तांडा तालुका किनवट येथे हनुमान मंदिराचा कलशारोहण प्राण प्रतिष्ठान ,व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक तीन फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान संपन्न
किनवट ( प्रतिनिधी) मौजे डोंगरगाव तांडा तालुका किनवट येथे हनुमान मंदिराचा कलशारोहण प्राण प्रतिष्ठान ,व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक तीन फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी हजारो भाविक येथे उपस्थित झाले होते.
ब्रम्हलीन ह भ प खाडे सिंग महाराज ,ब्रह्मलीन ह-भ-प भुजंगराव महाराज कोंधूररकर यांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुलाबसिंग महाराज, परमपूज्य लिंबाजी महाराज ह भ प मारोतराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर डोंगरगाव तांडा येथे प्राण प्रतिष्ठान कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या सप्ताहांतर्गत काकडा भजन, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण ,गाथा भजन ,भावार्थरामायण ज्ञानेश्वरी प्रवचन ,हरिपाठ, हरिकीर्तन ,जागर, भारुड इत्यादी कार्यक्रम संपन्न झाला या सप्ताहासाठी मारोतराव महाराज दिग्रस्कर, नागेश्वरी ताई झाडे आळंदीकर, मारोतराव महाराज इंद्रवेल्ली कर ,उद्धव महाराज गोळेगावकर ,श्री1008 महंत ज्ञानेश्वर भारती,इत्यादी नामवंत कीर्तनकार आणि आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला, या सप्ताहासाठी सावरी, दिग्रस एकम्बा, डोंगरगाव, थारा सावरगाव, दहेगाव इत्यादी गावचे भजनी मंडळ आणि आपले उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रसिंग बदलू साबळे नाईक हे होते मार्गदर्शक म्हणून मेघराज महाराज शर्मा हे होते. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण ब्रह्मनिष्ठ नारायण महाराज महादापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोहन पडवळ ,गोविंद पडवळ, गिरीधर मठावत, प्रेम साबळे, राजू नोळे,हरी पडवळ यांच्यासह यांच्यासह समस्त गावकरी मंडळ डोंगरगाव तांडा व पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.