किनवट/माहूर तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी यासाठी मा. प्रा.शिक्षनाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन निवेदन सादर
किनवट/प्रतिनिधी: किनवट व माहूर या डोंगराळ तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी यासाठी काल दि 27.01.2022 रोजी मा. सविता बिरगे मॅडम शिक्षनाधिकारी प्रा. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मा. देविदास बस्वदे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ. म. प्रा. शि. संघ अशोक पाटील, सुनिल राठोड जलधारा, बालाजी गुंडले जलधारा, आनंद पाटील कोसमेट, प्रल्हाद राठोड इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
या मागणीसाठी पूर्वीही अनेक प्रयत्न करण्यात आले होते व निवेदनेही सादर करण्यात आली होते. परंतु सदरील मागणी संदर्भात वरिष्ठ पातळीवरून सतत दुर्लक्षच होत गेले. सदरील निवेदना बाबत प्रा.शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्व किनवट/ माहूर तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
789 Views