किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शिक्षकांच्या प्रामाणिक कार्याचा सन्मान होतोच. – सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांना केंद्र मारेगाव मोहपूर यांच्यावतीने निरोप

किनवट/प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी केंद्र मारेगाव (व)येथे शिक्षणविस्ताराधिकारी तथा केंद्रप्रमुख शिवाजी दिगंबरराव खुडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा कोरोना नियमाचे पालन करून पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कनकवाडी गावचे सरपंच पंडितराव व्यवहारे पोलीस पाटील विलास सोळुंके पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जामगे पाटील कनकवाडी ग्रामसेवक सुनील जाधव मारेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय मडावी मोहपुर केंद्राचे केंद्रप्रमुख पद्माकर कवटीकवार,मारेगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक रमेश खूपसे,कनकवाडी शाळेचे मुख्याध्यापक दीपक राणे,जेष्ठशिक्षक संतोष दासरवार,पदवीधर शिक्षक दिपक डंबाळे,सौ.मणकर्णा शिवाजी खुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.सर्वप्रथम वरील मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी सुभाष कनकावार यांनी आपल्या कृतीयुक्त शैलीत स्वागतगीत गाईले.तर वामनदादा कर्डक संगीत अकॅदमी चे प्राचार्य सुरेख गोडगळ्याचे गायक सुरेश पाटील यांनी “अशी पाखरे येती” हे निरुपातीर्थ भावनिक गीत गायले.त्यानंतर निरोपमूर्ती शिक्षणविस्तारअधिकारी तथा केंद्रप्रमुख शिवाजी दिगंबरराव खुडे त्यांच्या पत्नी सौ.मणकर्णा शिवाजी खुडे यांचा सपत्नीक भर पेहराव आहेर तसेच शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केंद्र मारेगाव तसेच केंद्र मोहपूर यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत येथेच्छ असा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनकवाडी शाळेचे मुख्याध्यापक दीपक राणे यांनी केले.

शिक्षकांनी निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांची सेवा करावी कारण विद्यार्थी हा आपला दैवत असतो विद्यार्थी देशाचे भविष्य आहे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दैवत मानून प्रामाणिकपणाने अध्ययन अध्यापन करून त्यांचा सर्वांगीण विकास विकासासाठी सतत धडपडत राहावे आज जे निरोगी आयुष्य लाभले आहे ही सर्व माझ्या सेवाकाळातील विद्यार्थ्यांची पुण्याई आहे जसा आपला दृष्टिकोन ठेवाल तसेच आपले विचार घडतात त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक कर्तव्य केल्यास आयुष्यात आपणास कसलीच कमतरता भासणार नाही”.
– सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे

त्यात त्यांनी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांचे सेवकाळातील जुन्या आठवणीना उजाळा देत कनकवाडी शाळेचा वाढत्या चांगल्या यशस्वी वाटचाल याबद्दल मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये मारेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय मडावी मोहपूर केंद्राचे केंद्रप्रमुख पदमाकर कवटीकवार मारेगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक रमेश खूपसे तर शिक्षकपैकी सुभाष कनकावार,गंगाधर पुलकंटवार,रमेश आंधळे,रवींद्र चौधरी, सत्यभामा भगत,क्रांती श्रीमनवार यांनी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांच्याबद्दल यांच्या जीवनाविषयी तसेच सेवाकालामध्ये आलेले अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चांगली पैलू,सेवाकाळात मिळालेले सहकार्य याठिकाणी भावनिक वातावरणात कथन अनुभव केले.निरोपमूर्ती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षणविस्ताराधिकारी असा एकूण 34 वर्ष 4 महिन्याचा प्रेरणादायी प्रवास वर्णन करीत असताना तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते झालेला सत्कार व चांगल्या कामाची पावती भूगोल विषयांमध्ये असणारी सखोल अशी माहिती ज्ञान याविषयी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रशाळा मारेगाव शाळेचे शिक्षक सुरेश पाटील तर कनकवाडी शाळेचे शिक्षक विनायक मुंडे यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे आभार मानले.

244 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.