डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे यांच्या खुनातील गूढ उकलले; 4 आरोपी जेरबंद मुख्य आरोपी फरार ;यवतमाळ पोलिसांना मोठे यश
दिनांक 11/01/2022 रोजी सकाळी सोळा 45 वाजताच्या दरम्यान उमरखेड येथील आर पी उत्तरवार कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे यांची उमरखेड पुसद रोडवर साखळी महाविद्यालयासमोर एका अज्ञात इसमाने गोळ्या घालून हत्या केली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस स्टेशन उमरखेड बिटरगाव यांचे प्रत्येकी एक पथक स्थानिक गुन्हे शाखा येथील चार पथके व सायबर सेलचे दोन पथक असे एकूण दहा पथके तयार करून करण्यात आली सदर पथकांना योग्य ते मार्गदर्शन करून जिल्ह्यातील व जिल्हा लगतच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या. स्थागुशा व सायबर सेल यांनी मृतक यांचा पूर्वइतिहास कौटुंबिक कलह व आर्थिक वाद याची पडताळणी केली. घटनास्थळावरील तसेच उमरखेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना तपासण्याचे आदेश देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांचा पूर्वइतिहास कौटुंबिक पार्श्वभूमी व आर्थिक वाद यावरून डॉक्टर यांचे मृत्यूचे भक्कम कारण शोधण्याकरता प्रयत्न करण्यात आले. डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या वैद्यकीय सेवा काळात घडलेल्या घटना बाबत सखोल माहिती प्राप्त करण्यात आली. दरम्यान सन 2019 मध्ये पोलीस स्टेशन उमरखेड अपक 196/2019 कलम 279,304अ भादवी मधील मृतक नामे शेख अरबाज शेख अब्रार याचा दिनांक04/05/2019 च्या रात्री 2 वाजता च्या सुमारास शिवाजी चौक उमरखेड येथे मोटरसायकल चा अपघात झाला होता. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालय उमरखेड येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले त्या दरम्यान जखमी चा मृत्यू झाला. त्यावेळेस आर. पी. उत्तरवार कुटीर रुग्णालय येथे डॉक्टर हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर हजर होते. डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी डॉक्टरवर त्यावेळी केला होता. त्या दरम्यान पोलिसांनी घटनेची शहानिशा करून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करून प्रकरण हाताळे होते. त्यावेळेस मृतकाच्या लहान भाऊ नामे अल्फाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी डॉक्टर सोबत हुज्जत करून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती
सदर प्रकरणातील तांत्रिक बाबीचे बारकाईने विश्लेषण केले असता व या घटनेतील प्राप्त संशयिताचे सीसीटीवी फुटेज मध्ये दिसत असलेला संशयित हा शेख एफाज शेख अब्रार यांच्यासारखा चेहरेपट्टी व शरीरयष्टीचा दिसत असल्याने त्यांच्याबाबत गोपनीय बातमीदार नेमून अधिक माहिती काढली असता आरोपी नामे शेख एजाज उर्फ अप्पू शेख अब्रार वय 22 वर्षे, यांचे मामा नामे सय्यद तोसिफ सय्यद खलील वय 35 राहणार ढाणकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टर यांना गोळ्या घालून त्यांना ठार मारून ढाणकी येथून पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली.
सदर गोपनीय माहितीची व तांत्रिक बाबींची सांगड घालून गुन्ह्यातील आरोपी नामे सय्यद तोसिफ सय्यद खलील, सय्यद मुस्ताक सय्यद खलील वय 32 वर्षे, शेख मोहसीन शेख कयूम वय 34 वर्षे, शेख शाहरुख शेख आलम वय 27 वर्षे सर्व राहणार ढाणकी यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख एफाज शेख अब्रार वय 22 डॉक्टर हनुमंत धर्मकार्य यांच्यावर पाळत ठेवून त्यास घटनेच्या दिवशी गोळ्या घालून ठार केले व त्वरित ढाणकी घातले गुन्ह्यातील वापरलेली मोटारसायकल त्याने त्याच्या ढाणकी येथील मामा सय्यद सय्यद यांच्या ताब्यात दिली व त्यांच्या इतर साथीदाराच्या मदतीने तेथून पसार झाला .शेख ऐफाज शेख अब्रार यांनी आपला भाऊ शेख अरबाज शेख अब्रार यांचा मृत्यू चा वचपा व बदला घेण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या भावाच्या मृत्यूचा डॉक्टर कडून प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने गोळ्या घालून ठार मारल्याची हकीकत निष्पन्न झाली आहे.
सदरील गुन्ह्यांमध्ये या चौकासह वापरलेले वाहन हस्तगत करून मुख्य आरोपी फरार असून त्याच्या शोध घेण्यासाठी दहा पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा तपासामध्ये भादवि 109, 120 ब 212 भारतीय हत्यार कायदा कलम 3,27 तसेच अ. जा. ज. प्र. का. 1989 चे कलम 3,(2)(व्ही)ची वाढ करण्यात आली आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक के ए धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड प्रदीप पाडवी, पोलीस स्थागुशा प्रदीप परदेशी, ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड अमोल माळवे, ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगांव ,पोलीस स्टेशन दराटी, प्रभारी अधिकारी सायबर सेल अमोल पुरी, यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
सदरचा अत्यंत गंभीर, संवेदनशील व आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास व्यवसायिक कौशल्याचा व नैपुण्यचा पुरेपूर उपयोग करीत 48 तासात उघडकीस आणल्या बद्दल मा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार यांना रुपये 1,00,000 /- रोख प्रोत्साहन बक्षीस,सिनोट+जीएसटी जाहीर केले आहे.