नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी पकडला बायोडिझेलचा पंप
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी स्वत: बायोडिझेलचा बनावट पेट्रोलपंप पकडला आहे. या ठिकाणी 17 हजार लिटर बायोडिझेल सापडले आहे. हा पेट्रोलपंप नांदेड ग्रामीण पोलीसांच्या वाजेगाव चौकीच्या पाठीमागेच असल्याचे सांगण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची चलती आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव पोलीस चौकीच्या मागे असलेल्या आळणी बुवा मठाजवळ एका शटरमध्ये धाड टाकली. लगेच त्यांनी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना बोलावले.त्या ठिकाणी एका मोठ्या शटरमध्ये तीन मोठ-मोठ्या प्लॅस्टीक टाक्या आणि एक निळ्या रंगाची त्यापेक्षा लहान प्लॉस्टीक टॉकी सापडली. या टाक्यांना जोडून पेट्रोलपंपमध्ये असतात तसे पाईप जोडलेले होते.या पाईपांना वापरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार जोडलेली होती. सोबतच त्या ठिकाणी रिकामा झालेला एक बायोडिझेल टॅंकर सुध्दा होता. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांना सुध्दा बोलाविण्यात आले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 17 हजार लिटर बायोडिझेल आणि शटरमधील सर्व साहित्य तसेच रिकामा झालेला एक टॅंकर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यावरील कार्यवाही काय? यावर वृत्तलिहिपर्यंत कागदपत्र तयार झाले नव्हते. गुन्हे शोध पथकाने या बायोडिझेल पंपचा स्वत:च शोध घ्यायला हवा होता.पण गुन्हे शोध पथक धाबे तपासण्यातच आणि त्यांच्यासोबत राडा करण्यातच व्यस्त आहे.पण हा बायोडिझेल पंप शोध जिल्हाधिकाऱ्यांनी केला. आणि त्यानंतर आता गुन्हे शोध पथक काम करत आहे. अशा या परिस्थिती पुन्हा एकदा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची चलती आहे हे सिध्दच झाले. बायोडिझेल पकडले त्या ठिकाणी तीन व्यक्ती पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे दिसते.
कांही जाणकार लोकांनी सांगितले की, कांदा मार्केटच्या आसपास सुध्दा असाच किंबहुना यापेक्षा मोठा बायोडिझेल पंप लपवून सुरू आहे. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला का माहिती नाही याचा शोध घेण्यासाठी एखाद्या विद्यावास्पतीची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना करावी लागेल.