किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट च्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्यावतीने किनवट साईबाबा मंगल कार्यालयामध्ये दिनांक 03/12/2021 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास माजी आमदार प्रदीप जी नाईक, सहाय्यक जिल्हा अधिकारी किर्तिकुमार एच पुजार व आरोग्य विभागाचे कोरोना प्रतिबंधक लस देणारी टीम व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


किनवट येथील साई बाबा मंगल कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 03/12/2021 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त माजी आमदार प्रदीप जी नाईक यांनी उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली उद्घाटन पर बोलताना म्हणाले की मी पदावर नसताना माझा एवढा मानपान करत आहात खरोखरच आपण दिव्यांग असून जागृत आहात यापुढे मी आपल्या सर्व हक्कासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत असे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्यांगांना शासन स्तरावरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल यापुढे एकही दिव्यांग शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले यावेळी विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाची एक टीम कार्यक्रमस्थळी कारोणा विषाणू प्रतिबंधक लस घेऊन उपस्थित होते तर उपस्थित दिव्यांनी चांगला प्रतिसाद देत जवळपास 20 ते 30 दिव्यांगांनी कोरोना लस घेतली यावेळी विचार मंचावर माजी नगराध्यक्ष के मूर्ती, माजी नगराध्यक्ष साजिद खान, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, शिवसेना उपप्रमुख अतुल दर्शन वाढ, शिवसेना उपसंघटक सुरेश घुम्माडवार, मजूर फेडरेशन संस्थेचे संचालक स्वामी स्वामी नुतपेलीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजानन मुंडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते बालाजी बामणे, भाजपाचे आदिवासी युवा नेते जितेंद्र कुलसंगे हे उपस्थित होते यावेळी कोरोना कर्म योद्धा म्हणून संघटनेच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार एच पुजार यांना सन्मानपत्र देण्यात आले तर सूत्रसंचालन कॉम्रेड अडेलु बोंगिरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव राज माहुरकर यांनी आभार व्यक्त करताना सर्वप्रथम साईबाबा मंगल कार्यालयाचे संचालक गुरुस्वामी पवार यांचे आभार मानले यानंतर वेळातला वेळ काढून माजी आमदार प्रदीप जी नाईक व किर्तिकुमार पुजारी यांनी उपस्थित होऊन दिव्यांगांना मार्गदर्शन केले यामुळे त्यांचे विशेष आभार मानून कार्यक्रमाचे आयोजक राज माहुरकर यांनी दिव्यांगांच्या कार्यक्रमाला निमंत्रित करूनही काही मान्यवर उपस्थित न झाल्याने खंत व्यक्त केली व सर्व दिव्यांगांना व उपस्थितांना सुरुची भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले

393 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.