किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माहूर येथील 132 के.व्हि.विद्यूत उपकेंद्राच्या कामाला लवकरच सुरवात – आमदार भीमराव केराम

औरंगाबाद पारेषण विभागाचे मुख्य अभियंत्यांनी केली नियोजित जागेची पाहणी.

माहूर,ता.१८ (शहर प्रतिनिधी)
किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमरावजी केराम यांनी सार्वजनिक निकडीची बाब विद्युत पुरवठा नियमित होवून भरनियमन बंद होण्यासाठी दूरदृष्टीने उर्जा मंत्री नितिन राउत यांचेशी आग्रह करून माहूर सोबत किनवट मतदार संघातील इतर उपकेंद्राला मान्यता मिळवून घेतली.त्याबाबत महा पारेषण कंपनी संचालक मुंबई यांनी 132 के. व्हि उपकेंद्राला मंजूरी दिली असल्याचे दिनांक 9 फेबूरवारी 2021 रोजी पत्राद्वारे कळविले त्या अनुषंगाने (ता.१७) नोव्हेंबर रोजी औरंगाबाद महपारेषण विभागाचे मुख्य अभियंता श्रीराम भोपळे यांनी उपकेंद्राच्या नियोजीत जागेची पाहणी केली असता सदर जमीन ही खडकाळ असल्याने ती रद्द करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या असून येत्या आठ दिवसांत नविन जागेची पाहणी करण्याच्या संबतीतांना असल्याचे सांगितले.

माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध आहे.याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून माहूर तालूका हा आदिवासी बहुल डोंगराळ भाग असल्याने राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,यांची अभद्र युती होउन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले या सरकारच्या उदासीनतेमुळे १३२ के.व्हि.उपकेंद्राच्या कामासाठी चाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते असे असले तरी सदरे काम राजकीय अनास्थेपायी रखडल्याने या भागातील जनतेला कायमच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.तसेच मोठमोठे उद्योग,कारखाने सुरू करता आले नसल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,किनवट माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी २६ फेब्रुवारी २०२० पासून ते ९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सलग पाठपुरावा करून १३२ के.व्ही.उपकेंद्राच्या कामासाठी पाठपुरावा करीत असून या उपकेंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे केराम यांनी स्पष्ट केले.यावेळी नांदेड परळी (वैजनाथ) चे अधिक्षक अभियंता मिलींद बनसोडे,कार्यकारी अभियंता माधव सोनकांबळे,नांदेड प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नलबलवार सिव्हील अभियंता कांबळे,महापारेषन चाचणी विभागाचे श्री.अवाक, माहूर महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री.कोठे,कनिष्ठ अभियंता श्री.रापर्तीवार उपस्थित होते .

225 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.