किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पौर्णिमानगरात 66 कष्टकरी महिलांना दिल्या मोबाईल टिमने लसी

किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंद्यात ” मिशन कवचकुंडल” अंतर्गत विशेष लसीकरण मोहिमेत पौर्णिमानगरमध्ये लावलेल्या कॅम्पमध्ये एकाज दिवशी 66 कष्टकरी महिलांना लस देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर यांच्या संकल्पनेतील “मिशन कवचकुंडल ” अंतर्गत विशेष लसीकरण मोहीम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या नेतृत्वात तालुक्यात राबविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बाल विकास प्रकल्पाधिकारी आश्विनी ठकरोड, डॉ. संतोष गुंटापेललीवार हे लसीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.
गोकुंद्यातील पौणिमानगर येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्याय परिषद परिषदेच्या सहकार्याने लसीकरण कॅम्प लावण्यात आला होता. येथे पौर्णिमानगर व शंकरनगर येथील कष्टकरी महिलांना लस देण्यात आल्या. विशेषतः हा मुस्लिम बहुल व रोजमजुरी करणाऱ्या श्रमिकांचा भाग असल्याने येथे गृहभेटी घेऊन जनजागृती केल्यामुळे 85% मुस्लिम महिलांनी लस घेतली. या केंद्रावर नागरी दवाखान्याच्या फिरत्या पथकातील आरोग्य सेविका रेखा धडेकर व किरण मुजमुले यांनी लस टोचल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण नेम्माणीवार व मिडिया जनजागृती कक्षाचे उत्तम कानिंदे यांनी भेट दिली. शिक्षक कृष्णा सिक्कलवार, शिवाजी राठोड, प्रवीण भुर्रेवार, पालिका कर्मचारी राजू पिल्लेवार, अंगणवाडी सेविका सपना गायकवाड, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्यायिक परिषदेचे तालुकाध्यक्ष फेरोज शेख, महिला तालुकाध्यक्षा तथा अंगणवाडी सेविका कविता गोणारकर व सदस्या विमल पांडे यांनी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले. तर सैलानीबाबा महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्र. 255 च्या महेमूदा शेख निजामोद्दीन यांनी स्वतः लस घेऊन महिलांच्या मनातील भिती दूर करून लसीकरणास गती दिली.

179 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.