किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आशा व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेला घेरले स्थानिक मागण्या मान्य ;चार तास घेराव आंदोलन

सीटूच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले नेतृत्व

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने देश व्यापी योजना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या आवाहना नुसार जिल्हा परिषदेत चार तास घेराव आंदोलन करून स्थानिक मागण्या सोडवून घेण्यात यश मिळविले आहे.आंदोलनामध्ये दोन हजारा पेक्षाही जास्त आंदोलकांचा सहभाग होता.

आंदोलनाचे नेतृत्व आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.मागील तीन वर्षापासून अनेक आंदोलनामध्ये सातत्याने मागण्या करूनही आरोग्य विभागातील अधिकारी दाद देत नसल्यामुळे आशा नेहमी पेक्षा जास्त आक्रमक झाल्याने जि.प.च्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्थानिक मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले आहे.सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये.गट प्रवर्तक ताईंच्या गणवेशाचा कलर बदलण्यात यावा.गट प्रवर्तक ताईंना सहा महिने प्रसूती रजा मंजूर करून दरम्यान काळात लागू असलेले सर्व मानधन देण्यात यावे. गट प्रवर्तक ताईंना स्कुटी ची व्यवस्था करावी.आशा व गट प्रवर्तक ताईंना नोकरीच्या काळात अपघाती मृत्यू झाल्यास रूपये पाच लाखा नुकसान भरपाई आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास रूपये दोन लाख वारसांना देण्यात यावे.

आशा ह्या आरोग्य विभागाचा कणा असून काही वैद्यकीय अधिकारी,परिचारीका व इतर कायम कर्मचारी आशांना प्रचंड त्रासदायक ठरत असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या असून आशा व गट प्रवर्तक ताईंना सहकार्य केले नाहीतर संघटना व्यक्तीगत कार्यालयीन माहिती काढून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यास मागेपुढे पहाणार नाही कारण अनेक वैद्यकिय अधिकारीच कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत परंतु स्वतः असहकार्य करीत असतील तर लाल बावट्याचा हिसका दाखवावाच लागेल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलन जरी असले तरी मुख्य अडचण जि.प. व मनपा येथील अधिकाऱ्यांची असून आज दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पंधरवाड्यात झाली नाहीतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट घेराव घालणार असल्याचे मत कॉ.उज्वला पडलवार यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषदेत तीव्र आंदोलन चालू असतानाच महापालिकेच्या 75 आशांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू केल्यामुळे प्रशासकीय अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मानधन वाटपात अनियमितता केली असून विभागीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी एक वर्षापूर्वी पासून लावून धरण्यात आली आहे. आशा ह्या ७४ प्रकारचे काम करतात व त्यांना हेड नुसार मोबदला बँक खात्यावर वर्ग केला जातो परंतु महापालिकेत मात्र मोठी तफावत दिसून येत आहे.

मनपाचे आरोग्य अधिकारी हे स्थानिक असल्यामुळे ते आशा प्रति अनुकूल नाहीत व त्यांना कोणत्या निकषावर पद बहाल केले याची चौकशी होणे अवश्यक आहे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आंदोलनात फेडरेशनच्या पदाधिकारी कॉ.शीलाताई ठाकूर,कॉ.वर्षाताई सांगडे,द्रोपदा पाटील तर घरेलू कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड,जिल्हा समिती सदस्य कॉ.मारोती केंद्रे, कॉ.जयराज गायकवाड,कॉ.शेख मगदूम पाशा,गजानन गायकवाड,कॉ.दतोपंत इंगळे,शेख रफीक आदींनी सहभाग नोंदविला व आंदोलन यशस्वी केले.शेकापचे जिल्हा अध्यक्ष कॉ.सुभाशिष कामेवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

600 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.