किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कृषीकन्या प्रणाली चंद्रमणी पाटील हिने घेतली शेतकर्‍यांची जीवामृत व मोबाईल ॲप कार्यशाळा

किनवट ( नांदेड ) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय परभणी येथील कृषीकन्या प्रणाली चंद्रमणी पाटील हिने तालुक्यातील घोटी येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत (रावे ) शेतकऱ्यांसाठी जीवामृत व ई-पीक मोबाईल ॲप कार्यशाळा घेतली. हा कार्यक्रम ऑनलाईन व होम टू होम पद्धतीने राबविण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांचे जीवनमान, चारा प्रक्रिया, विकासासंदर्भात माहिती, सिंचनाचे महत्व शेंद्रीय शेतीचे महत्व, शेंद्रीय खतांचा वापर, माती परीक्षण, जीवामृत आणि मोबाईल ॲप ई-पीक पाहाणी विषयी माहिती देण्यात आली. भविष्यात तलाठी किंवा इतर अधिकारी आपल्या शेतीचा पेरा लिहिण्यासाठी आपणाकडे येणार नाहीत ” माझी शेती माझा सातबारा ,मीच लिहिणार माझा पिक पेरा ” या शासनाच्या बिरुदावली नुसार आपणास आपल्या शेतातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर करावी लागणार आहे.
मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी कशा कराव्यात याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली गेली. तसेच शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष रित्या मोबाईल ॲप वर नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवीले.शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली तर त्यांना देय असणाऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळू शकतो कृषी विभागाच्या विशिष्ट योजना जसे ठिबक, तुषार सिंचन इ. लाभ अचूकपणे शासनाकडून देणे सोपे जाते.शेत जमीन व पीक क्षेत्र यादी शासनास लवकर उपलब्ध होऊ शकते. पिक कर्ज, पिक विमा योग्य व अचूक शेतकऱ्यांना देता येतो.तसेच पीक पाहणी नोंदणी केली नसल्यास आपले शेत पडीत दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे समजले जाईल त्यामुळे पीक कर्ज व विमा मिळवून घेण्यासाठी अडचणी येतील जंगली जनावरांनी पिकांची नासाडी केली तर नुकसान भरपाई देखील मिळणार नाही. असे सखोल मार्गदर्शन कृषीकन्या प्रणाली चंद्रमणी पाटील हिने उपस्थित शेतकऱ्यांना केले.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस.व्ही. कल्याणकर व ए. डब्ल्यू. मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी गणेश बोंडाकर, चंद्रमणी पाटील, निलेश कयापाक, राजलिंगू पिल्लेवार, हरिदास ठाकरे, विजय पाटील, लक्ष्मण पिल्लेवार, अलिमोद्दीन भाई, आकाश कांबळे, परमेश्वर आत्राम आदी शेतकरी उपस्थित होते .

108 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.