किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अनेक रुग्णाच्या तक्रारीची दखल घेत प्रेस संपादक व सेवा संघ किनवट च्या पदाधिकाऱ्यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयास भेट

किनवट प्रतिनिधी:
किनवट तालुक्यातील सर्वात मोठे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे आहे व तालुक्यातील अनेक पीएससी बऱ्याच अंशी बंद असल्यामुळे किंवा तेथील डॉक्टर च्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे रुग्णांना ची प्रचंड गर्दी नेहमीच पाहायला मिळते या ठिकाणी एकूण 14 डॉक्टरची पदे मान्य असून त्या 2 शिफ्टमध्ये विभाग ला गेले आहेत. त्यामुळे एका शिफ्टमध्ये 7 डॉक्टर्स कार्यरत असतात. परंतु यातील काही प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे याठिकाणी डॉक्टर्स अपुरे पडत आहेत. सध्या डेंगू,मलेरिया,कावीळ, टाइफाइड ,व इतर आजाराने शेकडो लोक दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात परंतु सकाळच्या शिफ्टमध्ये दोनच डॉक्टर opd ला हजर असल्यामुळे आणि 600 ते 800 रुग्ण याठिकाणी तपासण्यासाठी येत असल्यामुळे प्रचंड गर्दी होत आहे. तसेच दोन डॉक्टर्स वर मोठा ताण येत आहे. तसेच OPD चा सकाळी 9 ते 12 वाजेपर्यत वेळ आहे.परंतु डॉक्टर्स उशिरा येतात त्या मुळे रुग्णांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोज दिसून येत आहे.तसेच येथील रुग्णांना वागणुक चांगली मिळावी अशी अपेक्षा रुग्णांची आहे. किनवट तालुक्यातील खासदार, आमदार असलेले लोकप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत येथील जनता आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवत आहेत तसेच किनवट येथील कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे असे येथील रुग्णांनी बोलून दाखवले. तेव्हा येथील डॉक्टरची व अपुऱ्या असलेल्या स्टाफची पूर्ण भरती करण्यात यावी यासाठी खासदार आणि आमदारांनी प्रयत्न करावेत आणि गोरगरिबांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे असेल रुग्णाचे म्हणणे आहे.

अनेक तक्रारीची दाखल घेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी यांनी या रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक उत्तम धुमाळे यांची भेट घेऊन त्यांना या सर्व समस्या अवगत करून दिल्या. त्यावर त्यांनी मी ही प्रभारीच आहे त्यामुळे माझे हे कर्मचारी ऐकत नाहीत आम्हाला पुरावा द्या किंवा लेखी तक्रार द्या. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन पत्रकारांना दिले तसेच रुग्णालय स्वच्छतेसाठी आमच्याकडे मनुष्यबळ अगदी नगण्य असून एक-दोन कर्मचाऱ्यावर सर्वकाही चालू असल्यामुळे शक्यतो आम्ही साफ करण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे प्रभारी अधीक्षक उत्तम धुमाळे यांनी सांगितले. तेव्हा लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे मनुष्यबळ कसे वाढवता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
या या प्रसंगी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव,तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसिर तगाले,ता.उपाध्यक्ष राजेश पाटील, तालुका सहसचिव प्रणय कोवे प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम, सहकोषाध्यक्ष मारोती देवकते, तालुका संघटक राज माहुरकर ,सदस्य रमेश पारचके,विशाल गिम्मेकर आदी उपस्थित होते

77 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.