3 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विरोधात इस्लापूर नाका येथे नांदेड- किनवट मुख्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
किनवट(आनंद भालेराव)
दिनांक 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विरोधात इस्लापूर नाका येथे नांदेड- किनवट मुख्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात इस्लापूर’ शिवनी’ जलधारा’ अप्पाराव पेठ परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरील रस्ता रोका यशस्वी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी विविध मागण्यासाठी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सखोल चौकशी करून नवीन गुत्तेदारना काम सोपविण्यात यावे, गेल्यावर्षी भरलेल्या पंतप्रधान पिक विमा योजना तातडीने वाटप करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, हिमायतनगर ते किनवट चालू असलेल्या हायवे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, कोस्मेट ब्रिज, कोलारी रेल्वे ब्रीज अंडर खाली असलेल्या पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचून येणाऱ्या- जाणाऱ्या जनतेचा होणारा त्रास टाळावा,वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे होत असलेल्या नुकसान थांबविण्यात यावा. व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी. इस्लापूर सर्कल मध्ये असणार्या प्रत्येक गावात वीज सुरळीत करा. शेतकरी विरोधी कायदे वापस घ्यावेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या. सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये देण्यात यावे. खाजगीकरण रद्द करावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आंदोलकांनी रास्ता रोको केला यानंतर महसूल खात्याचे तहसीलदार शेख यांना निवेदन देण्यात आले.