किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट नगरपालिकेचे सुभाषनगर,मथुरानगर नगर रस्त्याकडे दुर्लक्ष ; रेल्वे पुलाखाली लाईट बंद चिखलाचे साम्राज्य.

किनवट: सतत पडलेल्या पावसामुळे सुभाष नगर कडे जाणारा रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली चिखलाचे साम्राज्य पसरले असून याकडे नगरपालिका उघडपणे डोळेझाक करीत आहे.
पुलाखालुन ये-जा करण्यासाठी दोन बोगदे असून यापैकी एक बोगदा सतत बंदच असतो. कारण या ठिकाणी काटेरी झुडपे ही वाढलेले पाहायला मिळतात. अनेक दिवसांपासून या पुलाखालील गाळ काढला असल्यामुळे व पाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे तेथे हमेशा चिखलाचे साम्राज्य दिसून येते.
या पुलाजवळ एकही दिव्याचा खांब नसल्यामुळे येथे संध्याकाळी काळोखाचे साम्राज्य पसरलेली असते. हा रस्ता सुभाषनगर,समतानगर,सरस्वती कॉलोनी, मथुरानगर, दत्तनगर,हमाल कॉलोनी, गोकुदा कडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे येथील रहदारी रात्री उशिरापर्यंत चालू असते. परंतु या ठिकाणी लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असल्यामुळे तेथे केव्हाही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

100 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.