अंबाडी फाटा ते अंबाडी दरम्यान भरधाव कारने उभ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दुचाकीवरील ३२ वर्षीय तरुण जागीच ठार
किनवट-आदीलाबाद आतंरराज्य मार्गावरील अंबाडी फाटा ते अंबाडी दरम्यान भरधाव कारने उभ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दुचाकीवरील ३२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे
किरण श्यामराव पाटील असे मृत तरुणाचे नाव असून बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो मोटर सायकलने आपल्या नातेवाईकांना घेऊन आंबाडी गावाकडे जात होता रस्त्यात पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी अंबाडी गावानजीक रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी केली असता त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एम .एच.३१ एजी ५४०० या क्रमांकाच्या हुंडाई कारने उभ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला अपघातात किरण श्यामराव पाटील रा आंबाडी वय ३२ वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.धडक एवढी जोरदार होती की मोटार सायकलचा पूर्ण चुराडा झाला.घटनेची माहिती मिळताच किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दि १२ ऑगस्ट रोजी अंबाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी अज्ञात कार चालकांवर गुरंन २५५/२१कलम ३०४ अ आणि २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान किरण पाटील यांच्या अपघाती निधनामुळे आंबाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे