किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सम्राट अशोक बुद्ध विहार समितीच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व सेवानिवृत्तांचा सत्कार

किनवट : बुद्ध विहारे संस्कार देणारी ज्ञानकेंद्रे व्हावीत, ही केवळ वंदना घेण्यापुर्ती न रहाता येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी सुसज्ज अभ्यासिका निर्माण व्हावी, सेवानिवृत झालेल्यांनी दररोज दोन तास देऊन आज मोबाईल सर्चिंगमध्ये गर्क असलेल्या आपल्या मुलांना अभ्यासकरण्याकडे वळवविण्याची जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन भारतीय बौद्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी केले.
येथून जवळच असलेल्या गोकुंद्याच्या राजर्षी शाहू नगरातील विहाराच्या पहिल्या माळ्यावर सम्राट अशोक बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व सेवानिवृत्तांचा सत्कार कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी निवृत मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोड प्रमुख अतिथी होते.
प्रारंभी सम्यक सम्बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. प्रास्तविक केलेल्या रुपेश मुनेश्वर यांच्या साथीने वंदना घेऊन सुरेश पाटील यांनी अभिवादन गीत गाईले. त्यानंतर सेवानिवृत झालेले प्राचार्य राजाराम वाघमारे, केंद्र प्रमुख निलावती गरुड, वनपाल आनंद सोनकोबळे, अनुरेखक तांत्रिक हरि दर्शनवाड, पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे, कलाध्यापक रमाकांत गायकवाड यांचा ग्रंथ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्तींनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कानिंदे यांनी सर्व सत्कार मुर्तींचा परिचय करून दिला. बडू भाटशंकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर सर्पे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत कावळे, अशोक सर्पे, दीपक जाधव, प्रशांत डवरे, पंडीत घुले, विनय वैरागडे, दिलीप पाटील, सरोज चौदंते, मुकूंद मुनेश्वर आदिंनी परिश्रम घेतले.

111 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.