किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेते सुरेशदादा गायकवाड जन्मदिन सोहळा येत्या रविवारी १आगस्ट रोजी

नांदेड : फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेते *सुरेशदादा गायकवाड* जन्मदिन सोहळा येत्या रविवारी(दि.१) सायंकाळी ५ वाजता “आलवी”,निवासस्थानासमोरील अशोका गार्डन,आशिर्वाद नगर,पिवळी गिरणी, नांदेड येथे आयोजित करण्यात आला असल्याचे जन्मदिन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकुमार बनसोड यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रा.देविदास मनोहरे हे राहणार आहेत,तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रकाश कांबळे(पुर्णा), जेष्ठ विद्रोही साहित्यिक प्रा.डॉ. प्रकाश मोगले,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते पी.एस.गवळे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेत्या बबिताताई पोटफोडे या उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी जिल्ह्यातील फुले आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकरत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात एन.पी.कांबळे,तुळसाबाई सोनवने,टी.पी.सावंत,प्रा.देविदास मनोहरे,पी.एस.गवळे,बी.बी.पवार,वामनराव कावळे,गणेश जोगदंड,सदानंद जोंधळे, नंदकुमार जोंधळे,मोतिराम सोनकांबळे,जे.डी.कवडे,केशरबाई गोटमुखे,चंद्रकांत ठाणेकर,शंकर भाटापूरकर(देगलूर),दत्ता व्यवहारे,एल.ए.हिरे(भोकर),नितिन कावळे,फसिउल्ला खान,जेष्ठ पत्रकार एड.मिलिंद सर्पे(किनवट),जे.पी.मिसाळे,गंगाधर जाधव(धर्माबाद),सुभाष दारवंडे,साहेबराव नरवाडे(हिमायतनगर),गंगाधर सवई (उमरी),श्याम पांगरेकर,तुळशीराम भुरे(बिलोली) यांचा समावेश आहे.
दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत अंकुश चित्ते प्रस्तुत *भीमा तुझ्या जन्मामुळे* हा भीम गितांचा कार्यक्रम होईल. फुले -आंबेडकरी चळवळीतील जनतेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेशदादा गायकवाड जन्मदिन संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार जोगदंड,संजय नरवाडे, डी.पी.गायकवाड,डॉ. व्ही.एल.परतवाघ,एड.एम.जी.बादलगावकर,रोहिदास कांबळे,रवी गायकवाड, डॉ.दयानंद वाघमारे,भगवान गायकवाड, किशोर अटकोरे,इंजि.अशोक गायकवाड,टी.पी.वाघमारे,एम.के.शिरसे,शंकरराव एडके,प्रभू चौदंते,अंबादास हनमंते,एस.डी.दामोदर,चंद्रकांत भालेराव, अशोक गायकवाड,
(ठेकेदार),व्यंकट इंगळे,धम्मानंद गजभारे,महेंद्र पिंपळगावकर,बबन गजभारे,गौतम खिराडे,चंद्रमनी कांबळे आदिंनी केले आहे.

117 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.