आंबेडकरी व संविधान प्रेमी कृती समिती किनवट जिल्हा नांदेड तर्फे परभणी येथील आंबेडकरी समुदायावर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ किनवट तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकणार
किनवट/प्रतिनिधी:सर्व पक्षी आंबेडकरी व संविधान प्रेमी कृती समिती किनवट जिल्हा नांदेड तर्फे परभणी येथील आंबेडकरी समुदायावर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ किनवट तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 वेळ दुपारी 12.30 वाजता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय असणार आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चात सुरुवात होणार आहे तरी जास्तीत जास्त आंबेडकरी प्रेमींनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
25 Views