किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न

किनवट : तेजोमय प्रतिष्ठानच्या वतीने येथील संत गजानन महाराज संस्थान येथे बोधडी (बु ) येथील रहिवासी गानतपस्वी , स्वर भाग्य गुरुवर्य पंडित वसंत शिरभाते यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगीत वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा व संगीत मैफलीच्या भरगच्च कार्यक्रमाने महोत्सवात दिमाखात संपन्न झाला.
या महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक स्वरानंद सूर्यवंशी गंगाखेड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या महोत्सवातील भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी सादरीकरण करून स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. श्याम कल्याण पांचाळ यांच्या तबलावादनाने व राजेश ठाकरे यांच्या गायनाने उपस्थित सर्व संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले . मैफली नंतर विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक वृषभ हटकर पुसद यांनी मिळवले. तसेच द्वितीय पारितोषिक दिपाली चिरंगे यांनी पटकावले व तृतीय पारितोषिक नावेद शेख (विभागून) , राजेश पंडागळे (विभागून), उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक ऋषभ तोडसाम, द्वितीय जीवन मोरे यांनी उत्तम सादरीकरण करत यश मिळवले. दिपाली रामजी मुंडे यांनी सूत्रसंचालन व संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर सोनबा आहेरकर यांनी प्रास्ताविक
केले. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे सुरेश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी अंध विद्यालय बोधडीचे माजी विषय शिक्षक डी .एन .पांचाळ , रामराव पत्कि , मन सब योग साधना केंद्राचे योगतज्ज्ञ अखिल खान, स्तंभलेखक तथा केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , कन्यका परमेश्वरीच्या संचलिका भरतनाट्यम कलावंत रश्मीताई कंचर्लावार, अंध विद्यालय बोधडीचेसंगीत शिक्षक राजेश ठाकरे, संगीत साधक मधुवंतीताई , तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामजी ज्ञानोबा मुंडे, शिरभाते गुरुजींचे सुपूत्र संगीत साधक संतोष शिरभाते, मनीषाताई शिरभाते , इंदुताई मुंडे, दत्ता भिसे बोधडी इत्यादीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवास लाभली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामजी मुंडे, उपाध्यक्ष अनिता म्हेत्रे, सचिव ज्ञानेश्वर आहेरकर, कोषाध्यक्ष किरण हुंडेकर, सहसचिव ललित इंगोले ,सदस्य लक्ष्मण हैबेते, काजल आहेरकर , हितचिंतक दिपाली मुंडे, सुरेश पाटील, बालाजी गुट्टे, अर्जुन गुट्टे यांनी परिश्रम घेतले.

31 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.