बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचाराच्या निषेधार्थ किनवट मध्ये आंदोलन
किनवट/प्रतिनिधी :बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाज हा संकटात सापडला आहे. बहुसंख्या कट्टर मुस्लिम पंथीयांनी हिंदूचे धार्मिक सामाजिक आणि संता विरुद्ध उतपिडणावर जोर दिलाय. मानवाधिकाराच्या केल्या जात असल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 10 डिसेंबर रोजी किनवट मध्ये बांगलादेशी हिंदू न्याय यात्रा पार पडली.
सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत थेट प्रधानमंत्री मोदींनी हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदू समाज संत महंत मंदिर धार्मिक स्थळ सुरक्षित ठेवण्याची मागणी करणारे शेकडो हिंदूंच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र पाठवून बँग्लादेशाला इशारा दिला आहे. जागतिक मानव हक्क दिनाचे औचित्य साधून 10 डिसेंबर रोजी किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पुतळा मैदानातून बांगलादेशी हिंदू न्याय यात्रा काढून सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रामेश्वर मुंडे यांच्याकडे पत्र देऊन यात्रेचे सांगता करण्यात आली. इस्कांचे चिन्मय कृष्ण महाराजासह इतर धर्मचर्यासह अनेकांना केलेल्या अटकेतून सुटका करण्यात यावी, जागतिक पटलावर प्रधानमंत्री यांनी बांगलादेशी हिंदूवर केलेल्या मानव हक्क अधिकार व उल्लंघनाचा मुद्दा मांडून बांगला कट्टर पंथीयांचा क्रूर चेष्टा जगासमोर आणावे असे प्रधानमंत्र्यांना साकडे घातले आहे.