पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 8 फेर्या मंजूर औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे धावणार
परभणी/प्रतिनिधी
दसरा आणि दिवाळीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 8 फेर्या मंजूर केल्या आहेत.
पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेर्या :
गाडी क्रमांक 01451 पुणे-करीमनगर विशेष गाडी 28 ऑक्टोबर, 4 आणि 11 नोव्हेंबर रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्ररकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी पहाटे 2 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून 4 फेर्या पूर्ण करेल.
करीमनगर – पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेर्या :
गाडी क्रमांक 01452 करीमनगर- पुणे विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी तसेच 6 आणि 13 नोव्हेंब रोजी