किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जन्म झालेल्या जिल्ह्यातून जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दाखला उपलब्ध करून देण्यात यावा -सत्यनारायण डकरे

घूघुस/ प्रतिनिधी: जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्रामुळे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींना दूर करण्या यावे तसेच व्यक्तीचा जन्म झालेल्या जिल्ह्यातूनच जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दाखला उपलब्ध करून देण्यात यावा अशा आशयाचे पत्र महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना सत्यनारायण डकरे मागासवर्ग सेल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घूघुस यांच्या तर्फे पाठविण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यात जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र मिळवण्यास पालक वर्गांना चंद्रपूर जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात चकरा माराव्या लागत आहेत व जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यास लागणारे दस्तऐवज मिळवल्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
2014 पर्यंत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र चंद्रपूर जिल्ह्यातच मिळत होते परंतु आज ते मिळत नसल्यामुळे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात चकरा माराव्या लागत आहेत.
जात प्रमाणपत्र हे जन्म झालेल्या जिल्ह्यातून मिळाले पाहिजे असे आपण उपाययोजना करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यास अडचण येणार नाही.
सध्या स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अवैध पैसा मागितल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कु.दीक्षा संजय भालेराव या विद्यार्थिनींना जात वैधता नसल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. विद्यार्थिनी व व पालक यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे त्यांच्या आजोबाचा जन्म नांदेड जिल्ह्यातील असल्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांना नांदेड जिल्ह्यात जावे लागत आहे.
नांदेड जिल्ह्यात बऱ्याच वेळा जाऊन चकरा मारल्या परंतु अद्याप पण पत्र मिळाले नाही.
तरी आपणास विनंती की, वरील अडचणींना प्राथमिकता देऊन तात्काळ कारवाई करावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे .

151 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.