बाभळी उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्राचे संपादन कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना बुडीत जमिनीचे भूसंपादन करून मावेजा वाटप करा..रोशनगावकर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१२.मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनी दिनांक 17 सप्टेंबर,2023 रोजी संभाजीनगर येथे उपस्थित रहाणे साठी मा.ना.श्री एकनाथ शिंदे व दोन्ही उप-मुख्यमंत्र्यासह राज्य मंत्री मंडळाची बैठक दिनांक 16.09.2023 रोजी घेण्यात आली.
या बैठकित नांदेड जिल्हयातील (धर्माबाद तालुका) बाभळी मध्यम प्रकल्पासाठी चतुर्थ सुप्रमा मंजुर करण्यात आली.
बाभळी उ.पा.बंधा-यासाठी 771.20 कोटी मंजुर करण्यात आले.बुडित क्षेत्रातील 365 हेक्टर जमीन संपादनासाठी 188.62 कोटी मंजुर करण्यात आले.महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग शासन निर्णय क्रमांकः सुप्रमा 2023 (प्र.क्र.280/23)/म.प्र.मंत्रालय, मुंबई-400032 दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 प्रमाणे शासन मंजुरी व मान्यता मिळुन चार महिण्याचा कालावधी संपला आहे.
अद्याप भुसंपादन विभाग व पाटबंधारे विभागाने तातडीने उचीत कार्य सुरु करायला हवे होते.लवकरच राज्यात निवडणुका सुरु होणार आहेत. त्यासाठी अधिका-यांनी मार्च 2024 अखेर पर्यंत बुडीत क्षेत्राचे संपादन कार्यवाही पुर्ण करुन शेतक-यांना बुडित जमीनीचे भुसंपादन करुन मावेजा वाटप करावा.
आज पर्यंत पाटबंधारे विभागाने बंधारा स्थळी ईमारत बांधकामासाठी टेंडर काढले आहे.
बाभळी बंधारा ते बिलोली-धर्माबाद राज्य रस्त्याला जोडणारा रस्ता बांधकाम ईत्यादी कामे तातडीने करावीत ही अपेक्षा बाभळी उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मार्च 2024 अखेरपर्यंत बुडीत क्षेत्राचे संपादन कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना बुडीत जमिनीचे भूसंपादन करून मावेजा वाटप करावा अशी मागणी शंकरराव आनंदराव पाटील जाधव रोशनगावकर यांनी केली आहे.