वीज कामगारांच्या ज्वलंत प्रश्नासाठी द्वार सभा संपन्न. महाराष्ट्र राज्य विज लाईन स्टाफ बचाव कृती समिती चा यलगार.
नांदेड
वीज कामगारांचे प्रश्न व मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने दि.26ला नांदेड झोन समोर व संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रातील प्रत्येक झोन समोर द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. वीज कामगारांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीने केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीचे ईएलएचे ईश्वरसिंग टेलर , स्वंतत्र बहुजन संघटनेचे प्रकाश वागरे, विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे विजय रणखांब, नवनिर्माण सेनेचे बालाजी स्वामी, तांत्रिक संघटनेचे सुधाकर सीरमवार, सुनील टिप्परसे, मोहनसिंग जांघले, गजानन कोरडे, किशोर आडे, आकाश ठोमके, शिवशंकर भालेराव व ईतर पदाधिकारी व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महावितरणमधील वर्ग चारची नोकरीतील इंट्री पोस्ट कायम ठेवून वर्ग चार मधील शैक्षणिक प्राप्त लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग तीन मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. जी पूर्ववत पदे रद्द करण्यात आलेली आहे ती रद्द पदे पुनश्च सुरू करावी. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांना मागील पगारवाढ करारात नमूद असले प्रमाणे फरकास वाढीव पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ यांना स्वतंत्र श्रेणी देण्यात यावी. वसुली हे काम एक काम सांघिक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सुरक्षित साधने व लाईन मेन्टेन्स करिता योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे. कंत्राटी पद्धतीने नौकर भरती न करता सरळ सेवा भरतीने नोकर भरती करण्यात यावी. याव्यतिरिक्त प्रत्यक्ष चर्चात लाईनस्टाफ चे मुद्दावर निराकरण करण्यात यावे .अशा विविध मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक झोनसमोर लाईनस्टाफचे व कृती समितीचे द्वार सभा घेण्यात आलेली आहे. शासनाने प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समिती तर्फे करण्यात आलेली आहे. या द्वार सभेला विज कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.