किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी स.रणजीतसिंघ कामठेकर यांची नियुक्त

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील मातब्बर नेते तथा काँग्रेसचे सदस्य स.रणजीतसिंघ कामठेकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते गुरूवारी त्यांना प्रदान करण्यात आले.

स.रणजीतसिंघ कामठेकर हे विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत. शीख बांधवांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात ते हिरीरीने पुढाकार घेतात.शीख समाजातील सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते असलेले स. रणजीतसिंघ कामठेकर यांनी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे.

नांदेड जिल्ह्यात सरपंच संघटनेची बांधणी करून कामठेकरांनी राज्यस्तरावर त्याचा आवाज पोहोचवला. हुतात्मा पुरणसिंग सार्वजनिक वाचनालय,श्री बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे श्री बसवेश्वर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज याची स्थापना आणि संचालन करतानाच,सलग पाच वेळा ते कामठा बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य,सरपंच आणि उपसरपंच आहेत.

श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे सहकारी असलेले स्वातंत्र्यसैनिक स.खंडासिंघजी कामठेकर यांचा वारसा लाभलेले आणि माजी आमदार तथा स्वातंत्र्य सेनानी साहेबरावजी बारडकर, केशवराव देशमुख,स. चरणसिंघजी कामठेकर,स. बाबूसिंघ कामठेकर या काँग्रेसच्या परंपरागत खंदे समर्थक असलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनात स. रणजीतसिंघ यांनी काँग्रेसचे काम सुरू केले. सध्या ते डॉ.राहुल कराड यांच्या राष्ट्रीय सरपंच संसदेचे जिल्हाध्यक्ष आहेत.तथा राज्य सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदीही ते कार्यरत आहेत.आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या पदावर माझी नियुक्ती करत माझा सन्मान केला आहे.

त्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा आमचे नेते मा.अशोकरावजी चव्हाण,मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डी.पी.सावंत,मा.आ. ओमप्रकाशजी पोकर्णा,मा.आ. अमरभाऊ राजूरकर,समितीचे जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी नागेलीकर,राज्य साखर संघाचे संचालक तथा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड.सुभाष कल्याणकर या सर्वांचा मी अत्यंत आभारी असल्याचे कामठेकर यांनी म्हटले आहे.

72 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.