किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षात प्रवेश

किनवट ता.प्र दि २० राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील आदिवासी आघाडीच्या संघटनात्मक संरचनेत नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असुन आज दिनांक २० सप्टेंबर रोजी गोकुंदा येथिल शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आ. नाईक यांनी किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाची आदिवासी आघाडी घोषित केली ती पुढील प्रमाणेः किनवट माहुर विधानसभा अध्यक्ष (आदिवासी आघाडी) रामा बंडु उईके, किनवट तालुका अध्यक्ष (आदिवासी आघाडी) शामराव भुरके, किनवट तालुका कार्याध्यक्ष (आदिवासी आघाडी) लक्ष्मण गोविंदराव देशमुखे, युवक तालुका अध्यक्ष (आदिवासी आघाडी) बालाजी नारायण शेळके, युवक तालुका उपाध्यक्ष (आदिवासी आघाडी) मधुकर तुकाराम मेश्राम, युवक तालुका कार्याध्यक्ष (आदिवासी आघाडी) संतोष रामराव गेडाम, किनवट युवक उपाध्यक्ष (आदिवासी आघाडी) बालाजी रामचंद्र पाचपुते अशी किनवट तालुक्यातील पदाधिका-यांची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली तर माहुर तालुका अध्यक्ष पदी (आदिवासी आघाडी) तुकाराम मारोती तांबारे, माहुर युवक तालुका अध्यक्ष (आदिवासी आघाडी) नितिन महादेव मंडाळे यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्ती पत्रे मा. आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात देण्यात आले.
मा. आ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सर्वांनी एकमताने आगामी विधानसभा निवडणुकीत नाईक यांना भरघोस मताने निवडुन आणण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला. तर सेवा निवृत्त आदिवासी नेते शिक्षक, ज्येष्ठ नागरीक रामा बंडु उईके यांनी उपस्थित आदिवासी समाज बांधवांना यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले कि आपणास त्याच त्या मानसिकतेतुन बाहेर पडुन आपल्या मुलांच्या, भविष्यातील येणा-या समस्यांचा तोंड देण्यासाठी पुढे जाऊन काम केले पाहिजे. मा. आ. नाईक यांच्या सारखेच नेतॄत्वच हे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकते. आता पर्यंत आदिवासी समाज ज्या नेतृत्वासाठी झगडत होता त्या नेतृत्वाने दिलेला अनुभव हा आदिवासी समाजासाठी मोठी शिक्षा असुन आता आदिवासी समाजाने जुणाट मानसिकतेतुन बाहेर पडुन आपल्या उत्थानासाठी नाईक यांना निवडुन आणाणे हि काळाची गरज आहे. असे नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष (आदिवासी आघाडी) रामा बंडु उईके यांनी बोलतांना सांगितले आहे. तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु भुसारे यांच्यासह नवनियुक्त पदाधिका-यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. तर आदिवासी समाजावर असलेली टांगती तलवार हि नाईक साहेबांच्या विचाराने तोलवायची असुन केवळ आणी केवळ याच मार्गाने हि तलवार तोलवता येणे शक्य आहे असा सुर उपस्थितातुन व्यक्त करण्यात आला.
तर यावेळी आयोजित कार्यक्रमात गजानन सोळंखे यांनी सुत्रसंचलन केले, कचरु जोशी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी माजी सभापती अनिल पाटील, डॉ. रोहिदास जाधव, युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे, प्रविण म्याकलवार, शेख सरु भाई, शेख सलिम शेख मदार, ज्ञानेश्वर दहिफळे, अजित साबळे, महेश कनकावार, गोविंद धुर्वे, जयपाल जाधव, ज्योतिबा गोणारकर, रमेश इचछु, महेश तंबाखु, ताहेर भाई, तंटामुक्ती अध्यक्ष पाशा भाई, अमरदिप कदम, गणेश बेले, अशोक सुर्यवंशी, पृथ्वीराज आडे, मलिक चव्हाण, रामदास राठोड, रामदास भरकाडे, प्रमोद मुनेश्वर, ज्ञानेश्वर सिडाम, लक्ष्मण गुव्हाडे, राजु वाळके, गजानन पवार, शामराव भुरके, रविंद्र चव्हाण हसन चिखली, युसुफ चिखली यांच्यासह राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्यासंख्येने आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.

146 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.