दुचाकी चोरट्याविरुद्ध किनवट पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई बदल नागरिकाकडून कौतुक
किनवट प्रतिनिधी
किनवट शहरातील एस.व्ही.एम कॉलनी येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा किनवट पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दोनच दिवसात छडा लावला असून तेलंगणा राज्यातील बाजार हातनूर येथून त्यांनी मोठ्या सीताफिने दुचाकी जप्त केली व न्यायालयीन प्रक्रिया नंतर आज दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी किनवट पोलिसांनी सदर दुचाकी मूळ मालकाच्या स्वाधीन केली आहे.दुचाकी चोरट्याविरुद्ध किनवट पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई बदल नागरिकाकडून कौतुक केले जात आहे.
किनवट शहरातील एसव्हीएम परिसरात राहणारे आंतरोश किशन पेटकुले यांची हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी दीड महिन्यापूर्वी चोरीला गेली होती. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दुचाकी चोरट्याविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली व तेलंगणा राज्यापर्यंत तपासाची चक्रे गतीने फिरवून घटनेच्या दुसऱ्या दिवशी बाजार हातनूर येथून दुचाकी जप्त केली.न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि 17 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सदर मोटरसायकल मूळ मालक आंतरोश किशन पेटकुले यांना स्वाधीन केली आहे.याप्रसंगी बिट जमादार तुकाराम वाडगुरे युवा उद्योजक बाबा ऍग्रोचे मालक बाबा भाई युवानेते अभय नगराळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते किनवट पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.