किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात मोबाईलच्या टॉर्चने उपचार,जनरेटर नादुरूस्त *जिल्यात ग्रामीण रुग्णालचं व्हेनटिलेटरवर *प्रशासक राज्यात जिल्हा झाला पोरका

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.15.जिल्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयात कमी मनुष्य बळ इच्छानसलेले अधिकारी उदयास आल्यामुळे सध्या जिल्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमोडली आहे हे तेवढेचं सत्य आहे. कमी मनुष्य बळ व नियोजना अभावी जिल्यातील आरोग्य यंत्रणा अक्षरशः कोलंडली आहे. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटांचे असून नांदेड नंतर मुखेड येथील दवाखाना मोठा आहे.मात्र येथील प्रशासन यंत्रणा ढेपाळली असून लाईट गेल्यास मोबाईलच्या बॅटरीवर उपचार करण्याची वेळ येथील डॉक्टरवर आल्याचा प्रकार काल घडला. तेव्हा जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणा सुरळीत करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

काल दि.१४ जुलै रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान मुखेड शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ दोन मोटार सायकलची धडक झाल्याने ४ जन जखमी झाल्याची घटना घडली.जखमींना काही युवकांच्या तत्परतेने मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालय दुचाकीवर आणले. यात योगेश राजू दंडलवाड (वय १८)रा.मुखेड, लखन राजाराम फस्तनवाड(वय ३०)रा.मुखेड, सखूबाई लखन फस्तनवाड वय २५ रा. मुखेड, सागर लखन फस्तनवाड यांच्यावर डॉ.एस.एस.देशमुख परिचारिका एम.डी.पुंडे, परिचारिका एस.पी. वासमवाड,ब्रदर संतोष नरोटे हे उपचार करीत असताना अचानक लाईट गेली अन एकच गोंधळ उडाला.
यावेळी काही युवकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च चालू केली अन उपचार सुरू ठेवला. काही वेळानंतर लाईट आली पण उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. जखमी योगेश दंडलवाड यास जबर मार लागल्याने नांदेड येथे उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री संजय वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांना फोनद्वारे
उपजिल्हा रुग्णालयाच्या अनेकवेळा तक्रारी देऊनही काहीच फायदा होत नाहीअसे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.तर या अगोदर येथील भोंगळ कारभाराचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते.

या ग्रामीण रुग्णालयात सर्वच तालुक्यात कमी तज्ञ मनुष्य बळ असल्यामुळे डॉक्टरही परेशान आहेत.व काही अधिकारी यांच्या वर तर काही ही फरक पडत नाही त्यांचे हाथ बडे लंबे है…अशामुळे यांच्यावर कोणीच कार्यवाही करू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

130 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.