किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड येथे बौद्ध विवाह मेळावा 2023 मोठ्या थाटात संपन्न : अध्यक्षा अंजली ताईनी मानले सर्वाचे आभार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड : 23 मे 2023 रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे बौद्ध विवाह मेळावा नांदेड 2023 महिलांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या बौद्ध विवाह मेळाव्यात एकूण 19 जोडपी विवाहबद्ध झाली या विवाह मेळाव्याचे उद्घाटन प्रा. डॉ.संध्याताई मुक्तेश्वर राव धोंडगे( जि प सदस्या नांदेड), प्राचार्या, रजनी ताई मोरे व उज्वलाताई मानकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रम अध्यक्षा म्हणून प्राचार्य शुभांगी ताई ठमके ह्या होत्या. विवाह मेळाव्यामध्ये प्राध्यापक दत्ता भगत , माजी नगराध्यक्ष मोहन मोरे पूर्णा ‌, भिम शाहीर साहेबराव येरेकर, प्राध्यापक अनिल पाटील, काँग्रेस सोशल मिडियाचे शहरजिल्हाध्यक्ष इजिं.हरजिंदर सिंघ संधू, प्रयाग सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश पाटील, मंगाराणी अंबुलगेकर शिल्पाताई नरवाडे अनिता इंगोले अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला जवळपास सात ते आठ हजार समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित लावली होती.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळाव्याचे अध्यक्षा अंजलीताई मुनेश्वर उपाध्यक्ष सुनीता कानिंदे, सचिव वंदना घुले कोषाध्यक्षा पुष्पाताई भरणे सुप्रिया रावळे सुनीता वासाटे प्रा. सुजाता कांबळे कुसुम धोटे जयश्री भगत व सर्व महिला कार्यकारणी महिला मंडळ तसेच मार्गदर्शक सुनील भरणे सर अॅड.मुकुंदराज पाटील नारायण दादा घुले भास्कर दादा भगत पोलीस पाटील विजय रावळे सुरेश नगारे कोंडीबा वासाटे , प्रेमदास घुले व सर्व कार्यकारणी सदस्यांनी खूप मेहनत घेतली.
न भूतो न भविष्यती असा हा विवाह सोहळा नांदेडमध्ये संपन्न झाला.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम भाऊ धोंडगे, शिवसेना नेते मुक्तेश्वर भाऊ धोंडगे व आपल्या *महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब* यांनी या मेळाव्याला शुभेच्छा संदेश दिले

290 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.