किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वृक्ष तोडीचे नुकसान;नैसर्गिक ऑक्सिजनचे महत्त्व सांगत वटसावित्री पौर्णिमा साजरी; फुले दांपत्याच्या विचारायला उजाळा देण्यासाठी सावित्री शक्तिपीठ पुणे शाखा माहूरचा आगळा वेगळा उपक्रम!

वाई बाजार,ता.२५

वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सावित्री शक्तीपीठ पुणे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवून नवीन क्रांती घडवून आणली आहे.शक्ती पिठाच्या सक्रिय कार्यकर्त्या पद्मजा जयंत गिऱ्हे यांच्या पुढाकाराने(ता.२४) माहूर मध्ये फुले दाम्पत्यांच्या विचारांना उजाळा देत वटसावित्री पोर्णिमा साजरी करण्यात आली.

थोडक्यात सावित्रीची कथा अशी की,सत्यवानाच्या पत्नीने सत्यवानाचा प्राण यमाजवळून वापस आणला परंतु आज एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला यात ज्योतिराव फुले यांच्या सावित्रीने महिलांना जीवन जगण्याची,जिवंत राहण्याची,वागण्याची,खाण्याची,बसण्या,उठण्याची व काम करण्याची प्रेरणा दिली.अशी माय माऊली सावित्रीमाई ने महिलांना प्रेरीत केले.सत्यवानाच्या आणि ज्योतीबाच्या सावित्री सोबत वटसावित्री पौर्णिमा साजरी करून वृक्ष तोडीचे महत्त्व समजावून सांगून नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती करिता जीवनातील झाडांची उपयुक्तता कशी महत्त्वाची आहे.याविषयी महिला मंडळीना त्याचे महत्त्व विशद करण्यात आले.सावित्री माईंच्या विचारला उजाळा देत (ता.२४) रोजी श्रीक्षेत्र माहूर येथे या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने नवीन क्रांती आणून वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली.यासाठी माहूर शहरातील प्रत्येक महिलांनी खूप आनंदाने व स्वखुशीने या उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले.महिलांनी चूल आणि मूल या चौकटीपलीकडे जाऊन जर एखादी गोष्ट करण्याची ठरवली आणि ती करायची म्हटलं तर ती क्रांती नक्कीच घडणार पण त्याची सुरुवात त्याची ज्योत पेटली पाहिजे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्य करणाऱ्या पुणे येथील सावित्री शक्तीपीठ यांच्या माध्यमातून सदर अभिनव उपक्रम राबविण्यात आले. सावित्री शक्ती पिठाच्या सक्रिय कार्यकर्ते धडाडीच्या पत्रकार माळी समाजाच्या कार्यकर्त्या सौ.पद्मजा जयंत गिऱ्हे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या उपक्रमात माहुर शहरातील अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सरांचे आभार मानण्यात आले.हा उपक्रम सावित्रीच्या लेकीन कडून राबविण्यात आला

◼️विविध पुरोगामी सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांना प्रेरित करणारे सावित्री शक्तिपीठ व फुले दांपत्याच्या विचाराला प्रेरणेने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविला गेला वृक्षाचे महत्व व ऑक्सिजन चे महत्व काय असते हे महिलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा यावेळी प्रयत्न केला गेला झाडे लावा झाडे जगवा हा यातून संदेश दिला गेला.

सौ.पद्मा जयंत गिऱ्हे,
सावित्री शक्तीपीठ,माहूर.
मराठवाडा विभागीय अध्यशा

115 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.