किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवटच्या राखीव जंगलात अवैध वृक्षतोडीचे थैमान.!

*मराठवाड्याचे वाळवंट करण्यात वनरक्षक अधिकार्यात चढाओढ*

*उपवनसंरक्षक वाबळे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.!*

*पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जंगलात लावली जाते आग?*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेल्या किनवट तालुक्याला मौल्यवान आणि टिकावू अश्या सागवान लाकडाच्या जंगलाने व्यापलेले आहे.

एकीकडे शासन 2 कोटी,33 कोटी,50 कोटी वृक्ष लागवड अश्या विविध प्रकारच्या योजना आखून झाडे लागवड करताना दिसत आहे.तर दुसरीकडे ज्यांचावर येथील पूर्णत वाढ झालेल्या राखीव जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे.

अश्या वन विभागातील कर्मचाऱ्यांत राखीव जंगल नष्ट कसे करता येईल आपले हित करून घेण्यातच चढाओढ लागलेली दिसतं आहे.

किनवट वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असलेल्या राखीव जंगलातील अवैध वृक्षतोडीचे प्रकरण ठोस आणि सबळ पुराव्यासह मा.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब,(संरक्षण) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी सादर केले होते.ज्याला चौकशी कामी मा.मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांचे कडे तर त्यांनी ते उप वनसंरक्षक नांदेड येथील मा.वाबळे साहेबांकडे वर्ग करण्यात आलेले होते.ते त्यांनी सहायक वनसंरक्षक नांदेड यांचे कडे चौकशी कामी दिले होते.अशी ही टोलवाटोलवी होत आहे परंतु ठोस आणि सबळ अशी कोणतीही कार्यवाही अवैध वृक्ष तोड थांबवण्यासाठी होताना दिसत नाही आहे.

चौकशी साठी ठोस आणि सबळ पुरावे सादर करा नाहीतर चौकशी बंद करू असे पत्रव्यवहार करत चौकशीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलेले आजपर्यंत घडलेले आहे.

चौकशी अधिकारी यांना ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतानांही चौकशी साठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अवैध वृक्ष तोडीस एकप्रकारे पाठबळ देणाऱ्या सुस्त चौकशी अधिकारी यांचा मार्फत चौकशी केली जाईल असे दूर दूर पर्यंत दिसतं नसल्याने सदरील प्रकरणी चौकशी मा.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब (संरक्षण) नागपूर यांचे मार्गदर्शन खाली विभागीय अधिकाऱ्यानं कडून करत दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत राखीव जंगलाचे रक्षण करावे अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी पासून त्यांचा कार्यालय समक्ष (संविधान चौक)नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याचे निवेदन पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी दिलेले आहे.

सदरील प्रकरणी ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतानांही चोकशी साठी दिरंगाई होत असल्याने प्रशांत वाठोरे यांनी प्रत्यक्ष उप वनसंरक्षक केशव वाबळे साहेबांकडे चौकशी सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी मी चौकशी अधिकाऱ्याला बोलतो असे सांगत चौकशीला बगल देत एकप्रकारे अवैध वृक्ष तोडीस पाठबळ दिलेले दिसतं आहे.

174 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.