इस्लापूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी-काशिनाथ पाटील शिंदे
इस्लापूर: इस्लापूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव काशिनाथ पाटील शिंदे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनात काशिनाथ शिंदे पाटील यांनी अशी मागणी केली आहे की इस्लापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या येथे सुरू आहे या कामाचे ठेकेदार हे मनमानी पद्धतीचा अवलंब करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. शासनाच्या अंदाजपत्रकाला बगल देऊन सदरील काम होत आहे. या विभागाचे संबंधित अभियंता हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव काशिनाथ पाटील शिंदे यांनी केली आहे.