*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.धरणे आंदोलन दिल्लीत गेले ४० दिवसां पासून जंतर मंतर वर OROP -2 घ्या विसगंती बाबत चालू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व भारतीय माजी सैनिक संघटना पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना सैनिक फेडरेशन सैनिक माजी सैनिक विकास समिती वीर सैनिक ग्रुप या प्रमुख संघटनांच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यात जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय विधवा भगिनी आणि कांही सेवारत सैनिक सुद्धा उपस्थित होते.
ड्रा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या छायाचित्रांचा पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली होती.
समन्वय समिती प्रमुख रामराव थडके यांनी प्रस्तावना मांडली श्री हुम पठाण यांनी सूत्रसंचालन केले या देशव्यापी आंदोलनात देशातील सर्व माजी सैनिकांचे ओ आर ओ पी 2 मध्ये विसंगतीमुळे जवानांचे जे अतोनात नुकसान झालेले आहे त्याच्या विविध पैलू वर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश टाकून उपस्थितांना अवगत केले.त्यानंतर श्री रामराव थडके यांनी महामयिम राष्ट्रपती, पंतप्रधान व संरक्षण मंत्री यांना देण्यासाठीच्या निवेदनातील मागण्या वाचून दाखवून सर्वांची सहमती मिळवली.त्यानंतर हे निवेदन जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत यांना सादर केले.
त्यात शिष्टमंडळात समन्वय समितीचे सर्व सदस्य श्री ह्यूम पठाण,श्री ज्ञानेश्वर डुमणे,श्री बालाजी चुकलवाड,श्री.गजानन गव्हाणे.श्री.लक्ष्मण देवदे,श्री निलपत्रेवार आदि उपस्थित होते.
या आंदोलनात नांदेड शहर,कंधार, मुदखेड,भोकर,मुखेड,बिलोली तालुक्यातील माजी सैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री केशव मुंडे, देवराव झगडे, ज्ञानेश्वर डुमणे यांनी विशेष परिश्रम घेतले.