किनवट ता.प्रतिनिधी: सांगायो श्रावणबाळ योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना कमी अनुदान मिळत असले बाबतचे निवेदन शेख इमरान शेख चांदसाब शहराध्यक्ष युवा काँग्रेस किनवट तर्फे किनवट तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
सांगायो व श्रावणबाळ योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रतिमा 200 रुपये कमी अनुदान दिले जात आहे. यासंबंधी अनेक लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात लेखी व तोंडी निवेदन दिले असता अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही व त्यांचे अनुदान पूर्ववत सुरू झाली नाही.
सांगायो व श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी हे वृद्ध विधवा व गरीब असल्याने त्यांच्यासाठी या अनुदानाची रक्कम महत्त्वाची आहे. म्हणून या निराधारांना हे अनुदान वेळेवर व पूर्ण मिळणे जरुरीचे आहे. पण गेल्या एक ते दीड वर्षापासून 25% पेक्षा जास्त लाभार्थ्यांना दरमहा 200 रुपये कमी अनुदान मिळत आहे.
या योजनेतील गोरगरिब लाभार्थ्यांचा विचार करून यांना मिळणारे अनुदान पूर्ववत सुरू करावे व गेल्या एक ते दीड वर्षापासून कमी भेटलेले थकीत अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे या समस्त निराधार लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रतिमाह प्रमाणे अनुदान सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सांगायो व श्रावणबाळ योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रतिमा 200 रुपये कमी अनुदान!
132 Views