KINWATTODAYSNEWS

स्टीकफाॅस्टला लागला लळा तरुणाईचा घोटला गळा

*ट्युबने बालके नशेच्या आहारी*

*नव्या युगात तरुणाई बरबाद*

*धर्माबाद तालुक्यात खळबळ, पालकामध्ये चिंता*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.1.जिल्यात नवं तरुण मुलांना आता कागद,घरगुती प्लास्टिक साहित्य व इतर वस्तू चिटकवण्याचे स्टीकफाॅस्ट ट्युब हे बारा ते सोळा वर्षे वयोगटातील मुले नशा म्हणून वापर करित असल्याचे धक्कादायक माहिती धर्माबाद शहरात उघडकीस आली आहे.स्टीकफाॅस्टने शालेय बालके नशेच्या आहारी जात असल्याने जिल्यात खळबळ उडाली असुन पालकात माञ चिंता निर्माण झाली आहे.

स्टीकफाॅस्ट ट्युब हे पाणी पाऊचे रिकामी पाॅकीट व हातवर अथवा रूमालवर टाकुन मुले वास घेताच,क्षणात नशा येते,एक प्रकारे ड्रग्स अथवा दारू पिल्यासारखे मुलांना होते.
चार पाच मुले एकञ येऊन कुठेतरी कोणी दिसत नसेल अशा ठिकाणी जाऊन नशेली स्टीकफाॅस्ट ट्युबचा वापर करतात.स्टीकफाॅस्टची किमंत बारा रूपये असुन दहा ml ची आहे.

एक मुलगा दररोज नशेसाठी शंभर रूपयेचा खर्च करतो.शालेतील काही तरी वस्तू घेयाचे आहे म्हणून पैसाच आग्रह पालकाकडे करतात, पालकांना हे माहिती नसल्याने पैसे देऊन मोकळे होतात.मुले कधी शाळा सोडून कधी सुटीच्या वेळी नशा करतात अशी धक्कादायक माहिती एका पालकाकडुन उघडकीस आली.सदरील पालकांनी याची पुर्ण माहिती घेतली तेव्हा चौदा ते सोळा वर्षे वयोगटातील शालेय मुले बहुतांश नशा करतात हे उघडकीस आले..लहान वयातच मुले नशा करतात पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

*स्टीकफाॅस्टचा नशा करतात तेव्हा मुलामध्ये खालील प्रमाणे लक्षणे दिसत आहे.*

मुले घरी आल्यावर,घरात चिडचिड करणे,कोणती गोष्ट न ऐकणे,अभ्यासावर लक्ष न देणे , जेवणावर लक्ष न देणे,सदा बाहेर बाहेर राहाणे,राञीला कधी घरी उशीराने येणे,जेव्हा घरी लवकर आले तेव्हा लवकर झोपी जाणे, एवढेच नसुन बाहेर अवकाळी करणे,अल्प वयात मृत्यू चे लक्षणे व भविष्यात वेड्या सारखे बोलणे,असे अनेक मुलामध्ये लक्षणे दिसुन येत असल्यामुळे.मुलावरील कळा डगमाईला लागल्याने पालकात चिंता निर्माण होत आहे.

*प्रतिक्रिया*

पालकांनी आपल्या मुलाकडे काळजीने लक्ष द्यावे मुलगा काय करतो याची नेहमी विचारपुस करावी.शिक्षकांनी सुद्धा शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्याच्या स्वभावात बद्दल वाईट वाटत असेल त्याची चौकशी करावी तसेच,सामाजिक कार्यकर्ते,युवा तरूण पिढी सुध्दा शालेय विद्यार्थीकडे लक्ष ठेवुन जाग्रती करावी,संबंधित दुकारानी स्टीकफाॅस्ट ट्युब
चौदा ते सोळा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना देऊ नये.नाहीतर स्टीकफाॅस्ट ट्युबची विक्रीच करू नये,
नगरपालिका मार्फत सदरिल दुकानदारांना विक्री करु नये म्हणून नोटीस दिली तर दुकानदार विक्री करित नाही.

जेणे करुन शालेय बालके नशेच्या आहारी जाऊ नये
पुढील पिढी बरबाद होईल यांची काळजी सर्वानी काळजी घ्यावी.असे आवाहन धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले आहे.

183 Views
बातमी शेअर करा