KINWATTODAYSNEWS

पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीतास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2000/-रू.दंड. दंड न भरल्यास एक महीण्याची साधी कैदेची शिक्षा

किनवट प्रतिनिधी: पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीतास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2000/-रू.दंड. दंड न भरल्यास एक महीण्याची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
स्पेशल केस क्र. 58/2021 पो.स्टे किनवट गु.र.न 87/2021 कलम 354 a,452 IPC सह कलम 8,पोक्सो ॲक्टमध्ये आरोपी नामे दता गोवींदराव मामीलवाड वय 43 रा. कोपरा ता. किनवट यास आज दिनांक 31/03/2023 रोजी मा. अती.जिल्हा न्यायाधीश -1 पोक्सो कोर्ट आर.एन.पांडे साहेब नांदेड यांनी वरील आरोपीतास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2000/-रू.दंड. दंड न भरल्यास एक महीण्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती. एम ए बत्तुला मॅडम यांनी बाजू मांडली.
सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी – श्री.मुरली राठोड पो.उप.निरिक्षक पो स्टे किनवट
मा.पोलीस निरिक्षक श्री. बोरसे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी पो हे का 453 बी व्ही महाजन व एस एस ढेंबरे पो का 562 यांनी मेहनत घेऊन साक्षी पुरावे माननीय न्यायालयात हजर करण्यास मदत केली आहे.

327 Views
बातमी शेअर करा