KINWATTODAYSNEWS

रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात साजरा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.31.जिल्यातील धर्माबाद शहरा मधील रमाईनगर येथे अखंड भारतावरच नाही तर संपूर्ण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारे महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2327 वा जन्मोत्सव दिन,जयंतीची सुरुवात रमाईनगर येथील नागरिकांनी केली आहे.

दि. 29 मार्च रोजी सकाळी दहा वाजता राजा सम्राट अशोक,व संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचरंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुनिलचंद्र सोनकांबळे सर इतिहासकार यांच्या हास्ते करण्यात आले आहे.

कार्यक्रमास उपस्थित भा.बौद्ध महा सभा ता.अध्यक्ष सदानंजी देवके,डॉ. कैवारे,प्रा.शिध्दार्थ वाघमारे,अँड.गौतम सोनकांबळे, पोस्ट मॅन गंगाधर कांबळे बेळकोणीकर,आदींचे स्वागत सत्कार पुष्पहार देवुन कार्यक्रमाचे आयोजक सुरेंन्द्र देवके यांनी केले आहे.

दुसरे सत्रात सायंकाळी 7:30 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला असून त्यात सर्व मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले आहेत व अध्यक्षीय समारोप भाषणात सम्राट अशोकांचा इतिहासची सखोल अशी माहिती प्रा.सुनिलचंद्र सोनकांबळे दिली आहे. सुत्रसंचलन माधव वाघमारे कांगटीकर यांनी केले आनी आभारप्रदर्शन पत्रकार किशन कांबळे यांनी मानले.यावेळी रमाईनगर,साठेनगर येथील नवयुवक,उपा.उपासिका उपस्थित होते.

95 Views
बातमी शेअर करा