KINWATTODAYSNEWS

कोठारी ते हिमायतनगर या राष्ट्रीय माहामार्गाच्या निकृष्ठ कामामुळे चिखलमय रस्त्याचा परिसरातील नागरीकांना अतोनात त्रास ;लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

किनवट(आनंद भालेराव):
मागील तीन ते चार वर्षा पासुन कोठारी ते हिमायतनगर या राष्ट्रीय माहामार्गाच्या कामामुळे या परिसरातील नागरीकांना अतोनात त्रास व अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे, रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकल्याने रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक प्रवाशांना आपला जिव देखिल यादरम्यान गमवाला लागला आहे.


वाहने चिखलात फसत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर ग्रामिण भागातील नागरीक हे आपले गाव, घर गाठण्यासाठी जोखिम पत्कारुन चिखलातून मार्ग काढत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे किनवट दौ-यावर होते त्यांच्या वाहनांना देखिल राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा प्रत्यय आला व त्यांचे वाहन देखिल या मार्गावर अडकुन पडले होते.
कोठारी ते हिमायतनगर दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराचा दर्जा अत्यंत खराब असुन त्याच्या अक्षमते मुळे या मार्गाला विचित्र स्वरुप प्राप्प्त झाले आहे तर कामा दरम्यान कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने नागरीकांना व प्रशासनिक अधिका-याला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

418 Views
बातमी शेअर करा