*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.27.जिल्यातील धर्माबाद तालुक्या मध्ये उद्योग व्यवसायात प्रगती साधायची असेल तर सहकाराशिवाय ते शक्य होणार नाही.तसेच जिवनात प्रगती साधायची असेल तर शिक्षणा शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही सहकारातून समृध्दी व शिक्षणातून प्रगती हेच मुख्य धोरण घेऊन बुलढाणा अर्बन ची वाटचाल सुरू आहे आपल्या सर्वांचे सहकार्य व भक्कमपणे साथ पाठीशी असल्यानेच संपूर्ण आशिया खंडात ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक म्हणून बुलढाणा चां लौकिक निर्माण झाला आहे.
असे प्रतिपादन बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष भाईजी उर्फ रधेश्याम जी चांडक यांनी धर्माबाद येथे राजाराम काकानी सहकार विद्यामंदिर येथे विद्यार्थी संवाद कार्यक्रमात बोलतांना केले.
सहकार क्षेत्र आज स्थितीत जरी बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असले तरी सहकारा शिवाय समृध्दी शक्य नाही.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून नेहमीच केवळ व्यवसायिक मर्यादेत आडकुण न राहता सामाजिक कार्यात, धार्मिक सोहळ्यात बुलढाणा अर्बन अग्रेसर असते.स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थांना दर्जेदर व गुणवत्तापूर्ण सर्वाँना परवडणारे शिक्षण मिळावे म्हणून प्रायोगिक तत्त्वावर एक शाळा सुरुवात करण्यात आली होती त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला व आज रोजी राज्यभरात दोन डझन पेक्षा अधिक शाळा सुरू आहेत त्यातून हजारो विद्यार्थि ज्ञानाचे धडे गिरवित आहेत.
शिक्षे विना शिक्षण हे आमचे मुख्य धोरण असून सर्वसामान्य कुटुंबातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी नेहमीच विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
शालेय शिक्षणा सोबतच संस्कार मूल्य व आपल्या पारंपारिक सण उत्सवाकडे देखील विशेष कटाक्ष टाकला जातो असेही भाईजी उर्फ रधेश्याम जी चांडक यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. किशोर जी केला, अनंत जी देशपांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजाराम काकानी सहकार विद्यामंदिर व बुलढाणा अर्बन च्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले
नांदेड जिल्ह्यात बुलढाणा अर्बन ची कामगिरी उलेखणीय असून पालक संचालक सुबोध काकानी यांच्या नियोजनबध्द कार्याचे यावेळी भाईजी यांनी भरभरून कौतुक केले.तसेच शहरातील बँकेच्या शाखा,वेअर हाऊस ,कोल्ड स्टोरेज ची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
धर्माबाद शहराचे शैक्षणिक भवितव्य उज्वल करण्यासाठीं उद्योजक सुबोध काकानी व सौ. राजकुमारी काकानी यांच्या प्रयत्नातून हे सहकार मंदिर उभारणी करण्यात आले यातुन विद्यार्थि दर्जेदार शिक्षण घेऊन आपल्या गावाचे,राज्याचे व राष्ट्राचे नाव मोठे करतील असा विश्र्वास देखील भाईजी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला