KINWATTODAYSNEWS

जगाच्या पाठीवर महिलांना शक्तीच्या रूपात पाहून तिची पूजा करणारी एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय सनातन संस्कृती होय.- प्रा. डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन

किनवट( शहर प्रतिनिधी) :
जगाच्या पाठीवरअशा सर्व सामाजिक चळवळींचे नेतृत्व स्त्रियांकडेच असायला हवे; कारण शोषण कुठे, कजगाच्यासे व किती होते हे शोषितालाच कळू शकते, शोषकाला नव्हे! आणि म्हणून पुष्कळ सामाजिक चळवळीत व सामाजिक क्षेत्रात पुरुषाला न दिसणारे अन्याय स्त्रियांच्या नजरेत स्पष्टपणे दिसतात . भारताच्या इतिहासामध्ये अनेक प्रेरणादायी स्त्रिया होऊन गेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल त्यांच्या प्रेरणेतूनच इतिहास घडला. अशी प्रतिपादन जोगेंद्रसिंगजी बिसेन यांनी केले. दिनांक 25 मार्च रोजी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था किनवट या संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य डॉक्टर हेडगेवार समृद्धी व्याख्यानमालेत ते भारतीय महिलांचे सामाजिक व राष्ट्रीय योगदान आणि समर्थ भारतासाठी अपेक्षा या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम गजानन महाराज किनवट येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक ओदीवार हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून किनवट जिल्हा संघचालक संतोष तिरमनवार, व्यापारी संघटनेचे गजानन चाडावर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात माता सरस्वती, प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाची प्रास्ताविक अनिरुद्ध केंद्रे यांनी केले. यावेळी सौ सारिका वैद्य यांनी वैयक्तिक गीते गायली. सूत्रसंचालन प्रा. उत्तरवार यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

88 Views
बातमी शेअर करा