किनवट ता.प्रतिनिधी:
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार युथ काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ निरंजन केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत युथ काँग्रेसची किनवट तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार युथ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ निरंजन केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 मार्च 2023 रोजी पक्षाच्या संपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली होती.या बैठकीत युथ काँग्रेसची किनवट तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे युथ तालुका अध्यक्ष: इसरत शेख हसन,तालुका सचिव :सुरेश गोफने, उपाध्यक्ष: बादल राठोड, नितीन जाधव, महासचिव:निलेश पवार, राजगोपाल चव्हाण,प्रमेश्वर राठोड,मदन राठोड,सचिव: सुनील राठोड, अंकुश पवार, अरविंद चव्हाण, सरचिटणीस:आकाश चव्हाण, जावेद शेख मजहर, देवानंद जाधव यांची तर किनवट शहर युथ कार्यकारणीत शहराध्यक्षपदी शेख इम्रान चांद रतनजी, शहर उपाध्यक्षपदी लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शहर सचिव-अब्दुल खालिद अब्दुल शफी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युथ काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल अनंतरावं केशवे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार,युवानेते सुभाष बाबू नायक राठोड, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष आडकिने पाटील, सय्यद अनवर, फारुख चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
युथ काँग्रेसची किनवट तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच घोषित ता.अध्यक्षपदी इसरत शेख हसन यांची निवड
201 Views