*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.23.महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यानी
सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयात पाच जिन्नस देण्याचा निर्णय घेत लोकांना देऊन दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता आणि दिवाळी गोड ही झाली परंतु राज्य सरकारने शंभर रुपयांतील आनंदाची शिधा घेण्यासाठी लोकांनी दिवाळीत गर्दी केली होती.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शंभर रुपयात आनंदाची शिधा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता परंतु गुडी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाची शिधा मिळण्या ऐवजी लाभार्थाच्या पदरी निराशाच पडली असल्याने गुढी पाडवा पार पडला आला तरी अनेक ठिकाणी सरकारचा हा आनंदाचा शिधा पोहचला नसल्यामुळे दुकानदारा कडून सांगण्यात येत आले आहे
*संपाचा फटका आनंदाची शिधावर कशामुळे?*
जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील दिनांक १४ मार्च २०२३ पासून सर्व क्षेत्रातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते म्हणे याचा परिणाम शिधा वाटपावर होताना दिसतोय याचा फटका आनंदाची शिधा याला बसला असल्याचे कारण राज्य सरकार समोर करून गुडी पाडव्याला शिधाच पाठविला नसल्यामुळे सरकारची सदरची योजना बारगळली की काय ? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे
गुढी पाडवा संपला असला असला तरी काही दिवसातच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२३ रोजी जयंती असल्यामुळे त्या निमित्ताने राज्य सरकारने‘आनंदाची शिधा’यात सरकार कडून पाच जिन्नस देणार ? का यात दाळ तेल साखर रवा अशा वस्तू १०० रुपयात दिले पाहिजे असे लाभार्थ्यांतून बोलल्या जात आहे.