नांदेड जिल्हा प्रतिनिधी/संजीवकुमार गायकवाड :
1500 ची लाच स्विकारतांना प.स. उमरी(स्टे.) येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विना गुणवंतराव सूर्यवंशी या रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकल्या.
यातील तक्रारदार यांनी दिनांक 23/03/2023 तक्रार दिल्यावरून अँटी करप्शन ब्युरो नांदेड यांच्या पथकाने दिनांक दि.24/03/2023 सापळा लावला व यात 1500 रुपयाची लाच स्वीकारताना मीना गुणवंतराव सूर्यवंशी यांना रंगेहात पकडण्यात आले.
सविस्तर असे की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत शेत विहीर मंजूर झाली होती. सदर विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांना शासकीय अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेला आहे. तक्रारदार यांनी सदर विहिरीचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर विहिरीचा शासकीय अनुदानाचा दुसरा हप्ता मिळणे करिता त्यांनी फाईल तयार करून पंचायत समिती उमरी येथे दाखल केली होती. त्यानुसार विहिरीचा शासकीय अनुदानाचा दुसरा हप्ता मंजुर करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक विना सूर्यवंशी यांनी रु.1,500/- लाचेची पंचासमक्ष मागणी केली.
उपरोक्त लाचेची रक्कम रु. 1,500/- सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन उमरी, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरील कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड. यांच्या मार्गदर्शना खाली पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.,सापळा/तपास अधिकारी श्री कालिदास ढवळे,पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड. सापळा कारवाई पथक पोलीस उप अधीक्षक, श्री अशोक इप्पर, सपोउपनि संतोष शेटे, मपोहेकॉ मेनका पवार, पोना राजेश राठोड, चापोहेकॉ मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो, यूनिट नांदेड. यांनी यशस्वीरित्या पार पडले.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
मोबाईल क्रमांक 9623999944
श्री राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
मोबाईल क्रमांक – 7350197197
*कार्यालय दुरध्वनी – 02262-253512*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
1500 ची लाच स्विकारतांना प.स. उमरी(स्टे.) येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विना गुणवंतराव सूर्यवंशी रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात.
233 Views