किनवट (तालुका प्रतिनिधी) : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था किनवटच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य डॉक्टर हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन २५ व २६ मार्च रोजी गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. २५ मार्च रोजी प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्रसिंगजी बीशेन प्रभारी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे भारतीय महिलांचे सामाजिक व राष्ट्रीय योगदान आणि समर्थ भारतासाठी अपेक्षा या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत तर २६ मार्च रोजी सौ डॉक्टर मधुश्रीजी सावजी विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय मंत्री व शिक्षण तज्ञ हे दुसरे पुष्प बोलकी होतील घरे यावीषयावर गुंफणार आहेत. आर्थिक क्षेत्रात सतत अग्रेसर सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडत किनवट येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने परमपूज्य डॉक्टर हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने दोन दिवशीय व्याख्यानमाला २५ व २६ मार्चला सायंकाळी सात वाजता गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित केले आहे. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी किनवट शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती जलकल्याण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक ओद्दीवार, उपाध्यक्ष अनिरुद्ध केंद्रे, सचिव प्रा. प्रकाश उत्तरवार व पतसंस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे अशी माहिती या पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश पवार यांनी दिली.
किनवट येथे २५ व २६ मार्च रोजी डॉ. हेडगेवार स्मुर्ती व्याख्यानमालेचे आयोजन
85 Views