KINWATTODAYSNEWS

अवैद्य तस्करी करत असताना कटसाइज सागी लाकडा सह इंडिका कार जप्त; आरोपी फरार होण्यात सफल.

किनवट/प्रतिनिधी:
किनवट वनपरिक्षेत्रात अनेक वेळेस धाडी टाकून तसेच पाठलाग करून अवैध सागवन तस्करीला आळा घातला जातो.
आज दिनांक 23/6/2021 रोजी गुप्त माहितीवरून मा.उपवनसंरक्षक नांदेड एम. आर. शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या सागवान वाहतूक करीत असल्याचे माहिती मिळाल्यावरून किनवट येथून तस्कराचा पाठलाग करत अंबाडी FDCMकक्ष क्रमांक 142 च्या लगत रस्त्यावर एक इंडिका एपी 9 एक्स 7665 या क्रमांकाच्या गाडीतून कट साइज नग बाहेर फेकून तस्कर फरार होण्यात सफल झाले.
त्या गाडीत कट साईज नग- 23 ,घ.मी.0.0901 ,किमत -5613 अंदाजे गाडी किंमत 60000असे आहे.
सदरील कार्यवाही मध्ये मा.वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. खंदारे साहेब वनपाल के. जी. गायकवाड, एस. डी. खामकर, एन. के. चुकलवार, के. पी. मुळे, व फिरते पथक वाहनचालक बी. व्ही. आवळे, बी. ती. भुतनर वन मजूर भावसिंग जाधव व तसेच एफडीसीएम चे कर्मचारी वनपाल एस. यु. काळेवार वनरक्षक एस. आर. शिंपाळे, अमोल शिरसे, एस. एम. सूर्यवंशी, शेख मोडीन, बी. जे. पेदे, एस. बी. मोरे, यांचा सदर कार्यवाही मध्ये सहभाग होता.
वन परिमंडळ यांचा प्र.गु.री.क्र. 03/2021 दिनांक 22/6/2021 नुसार गुन्हा नोंद केला.

361 Views
बातमी शेअर करा