*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि 21.नांदेड रेल्वे डिव्हिजन येथे श्रीमती नीती सरकार,IRAS यांनी आज 21 मार्च 2023 पासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचा पदभार स्वीकारला आहे.
श्रीमती.सरकार यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक. केले आहे.
श्रीमती निती सरकार या भारतीय रेल्वे लेखा सेवा 1994 बॅचच्या अधिकारी आहेत.
श्रीमती.सरकार सुरुवातीला भारतीय रेल्वेमध्ये 1995 मध्ये जम्मू आणि उधमपूर रेल्वे लाईन प्रकल्पात रुजू झाल्या.
येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
ज्यात –
1) संचालक,माहिती आणि प्रसारण मंत्रालय,नवी दिल्ली
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, NATRiP/जड उद्योग विभाग
3) आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी/बांधकाम/उत्तर रेल्वे
03 डिसेंबर 2019 रोजी नांदेड विभागात रुजू झालेल्या श्री उपिंदर सिंग,IRTS यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे